संगमेश्वर- भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेड खुर्द नं.1 शाळेत विद्यार्थ्यांनी संविधान दिवस साजरा केला. सकाळी 10 वाजता संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संविधानाचे प्रास्ताविक सामूहिक गायन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना यावेळी श्रद्धांजली देण्यात आली.
इयत्ता 1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीत सहभाग घेतला. यावेळी भारत माता की जय , वंदे मातरम्, भारत माझी माऊली संविधान त्याची सावली अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच घरोघरी जाऊन घर घर संविधान या अभियानांतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते घरोघरी वाटप करण्यात आले. संविधान दिनाची सर्व तयारी शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर व जाधव मॅडम यांनी केले.