झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश कदम यांचे निधन

Spread the love

रत्नागिरी :- झी २४तास या वृत्तवाहिनीचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट आणि शहरा नजिकच्या शीळ गावचे रहिवासी निलेश कदम यांचे मुंबईतील सायन येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले .
गेली १० वर्ष कॅमेरामनच्या भुमिकेत वावरणारे निलेश कदम गेली ५ वर्षे झी २४ तासचे रत्नागिरीतील व्हिडिओ जर्नालिस्ट म्हणून काम करीत होते .घरची शेती संभाळून त्यांनी पत्रकारितेमध्ये कॅमेरामन म्हणून आपला ठसा उमटवला . जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील अनेक घडामोडी त्यांनी कॅमेऱ्यात टिपल्या .दुरदर्शन, साम मराठी आणि झी २४ तास या ठिकाणी त्यांनी काम केले . चिपळूणच्या महापूरापासून ते जिल्ह्याात आलेल्या वादळांचे कव्हरेज त्यांनी केले .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page