रत्नागिरीत देवाभाऊंशी महिलांचा संवाद…

Spread the love

रत्नागिरी: महायुती सरकारची लाडकी बहिण योजना राज्यात सुरू झाली असून पहिले दोन हप्ते खात्यात जमा झाले आहे. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रविवारी (ता. १८) लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. याचा कार्यक्रम दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला असून यात महिला बचत गट, लाभार्थी महिला, सामाजिक कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. भाजपच्या दक्षिण जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माने म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ही योजना घोषित केली आहे. या योजनेबद्दल माता-भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील ३७ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेला महिला प्रदेश चिटणीस शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, शहराध्यक्ष राजन फाळके, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, संजय निवळकर, भाई जठार, शोनाली आंबेरकर, राजन पटवर्धन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. अंधेरी पूर्व येथील महापालिकेच्या मैदानामध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्याचवेळी ऑनलाईन सर्व राज्यात हा कार्यक्रम होईल.

हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून लाभार्थी दोन भगिनींना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ केवळ घोषित केली नाही तर भरीव निधीची तरतूद करून योजना अंमलात आणली आहे. लाडकी बहीण योजना असो वा समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना असोत त्यामुळे महिलांचा महायुतीला पाठिंबा असल्याचे शिल्पा मराठे आणि सुजाता साळवी यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page