तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात नाही तर जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देश इंडोनेशियाच्या नोटेवर गणपतीचे चित्र छापलेले आहे. इंडोनेशियातील सुमारे ८७.५ टक्के लोक इस्लामला मानतात. तिथे फक्त ३ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. चला जाणून घेऊया तिथे नोटेवर गणपतीचे चित्र का आहे?
इंडोनेशियाच्या चलनाला रुपिया म्हणतात. तिथे २० हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. खरं तर इंडोनेशियामध्ये श्रीगणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानले जाते.
इंडोनेशियामध्ये २० हजाराच्या नोटेवर पुढच्या बाजूस गणपतीचे आणि मागे वर्गखोल्याचे चित्र आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. यासोबतच इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचेही चित्र आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत.
असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था फारच ढासळली होती. तिथल्या राष्ट्रीय आर्थिक विचारवंतांनी खूप विचार करून वीस हजाराची नवी नोट प्रसिद्ध केली, ज्यावर श्रीगणेशाचे चित्र छापलेले होते. त्यामुळेच तिथली अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे लोकांचे मत आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशात केवळ गणपतीच नव्हे, तर इंडोनेशियन आर्मीचे शुभंकर हनुमान जी आहेत. तसेच एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती देखील आहे.