
ठाणे : निलेश घाग मराठी पाट्या लावण्याची २५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापनामध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्व्ये बंधनकारक आहे, असे असतांना देखील पुण्यात तसेच राज्यभर दुकानदारांकडून इंग्रजीमध्ये पाट्या लावण्यात आल्या आहेत. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा विभाग तर्फे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र मधील सर्व दुकानदार यांना मराठी भाषेला महत्त्व दिले पाहिजे. तसेच दुकानावरील फलक देवगिरी लिपी मध्ये असायला पाहिजे याकरीता लेखी पत्राच्या स्वरुपात समज देण्यात आली.

अशी’ आहे नियमावली
दुकाने आणि आस्थापना यांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.

दिवा शहरांतील दुकानावरील फलक मराठी भाषेत दिसुन न आल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल – सोनिष माधव
यावेळी मनविसे विभाग अध्यक्ष सोनिश माधव,उप विभाग अध्यक्ष देवा घाडी ,शाखा अध्यक्ष नम्रता खराडे,उप शाखा अध्यक्ष दिनेश महाडिक ,उप शाखा अध्यक्ष उदय कुंभार,गटाध्यक्ष अक्षय धावडे,सुरेश महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
जाहिरात

