विरोधकांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, आम्ही जनतेला बांधील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कर्जतमधील निर्धार सभेत विरोधकांचा समाचार,
तर जनतेच्या मनातले आम्ही ओळखतो म्हणत सुधाकर घारे यांना विधानसभेचे संकेत, तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा जंगी रोड शो, ३० जेसीबीमधून फुलांची उधळण

Spread the love

कर्जत : सुमित क्षीरसागर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो, आणि तो कसा पुढे जाऊ शकतो याची शिकावं स्व.यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. त्याच मार्गाने आपल्या सर्वाना पुढे जायचं आहे. तर अलीकडे विरोधक रोज काहीतरी माध्यमांवर येऊन आमच्यावर टीका करत असतात. मात्र आम्ही काही त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. आम्ही जनतेची कामे करायला बांधील आहोत. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तर आज या गर्दीमधून सतत घोषणा येत होत्या तेव्हा येथील जनतेच्या मनात काय आहे हे माहित असून आम्ही बहुमताचा विचार करणारे आहोत असे म्हणत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सुधाकर घरे यांना विधानसभेचे संकेत देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची निर्धार सभा कर्जत पोलीस मैदान येथे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन होताच कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष कार्यालयाचा लोकार्पण सोहळा ना. पवार यांच्या हस्ते पार पडला. तर येथून सभास्थळ पर्यंत असा जंगी रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो दरम्यान श्रीराम पूलपर्यंत ३० जेसीबीने मान्यवरांवर फुलांची उधळण करण्यात आली. तर हा रोड शो पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. तर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार अनिकेत तटकरे, प्रमोद हिंदुराव, सायली दळवी, दत्तात्रेय मसुरकर, युवकचे अंकित साखरे, कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, महिला कर्जत तालुकाध्यक्ष रंजना धुळे, प्राची पाटील, कुमार दिसले, आदी यावेळी मंचावर उपस्थित होते. कर्जत पोलीस मैदान येथे निर्धार सभेच्या मंचावर राजिपचे माजी उपाध्यक्ष व सभापती सुधाकर घारे यांच्याकडून पक्ष अध्यक्ष अजित पवार याना फेटा बांधत शिव प्रतिमा व चांदीची तलवार भेट म्हणून देण्यात आली. तर इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले. यानंतर सुधाकर घारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना घारे म्हणाले कि पक्ष मजबूत करण्यासाठी आपण निर्धार करायला हवा, हा निर्धार आपले नेते अजित पवार व सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याचा असायला हवा. सुनील तटकरे हे आम्हाला वडील म्हणून सोबत राहिले आहेत. तर

अजितदादा ज्या दिवशी मुख्यमंत्री होतील तो सोन्याचा दिवस असेल. तसेच तटकरे साहेब हे आमच्या कार्यक्रमाला आल्याशिवाय आमचा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. असे असले तरी कर्जतचा विकास अजूनही होणे बाकी आहे. कर्जत तालुक्यात ग्रामीण दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजही गावांमध्ये जायला रस्ता नाही, आसलवाडी, बेडी गाव येथे रस्ता नाही, याठिकाणी रस्त्यासाठी वनविभागाची अडचण येते. कर्जतमध्ये विकास झाला. शहरातील रस्ते मोठे झाले, शहरीकरण झाले हे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यामुळे झाले. मात्र आज कर्जत मध्ये विकासावर कुणी हक्क सांगत तर या विकासामागे कोण आहे ते जनतेला माहित आहे. कर्जतच्या विकासासाठी आपण लक्ष द्यावं. माझं गाव दरड ग्रस्त म्हणून जाहीर केल आहे. दरड ग्रस्त गावांच्या पुनर्विकासासाठी आपण लक्ष द्यावं असे कर्जत तालुक्याचे प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित मान्यवरांसमोर मांडले. तर कर्जतचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस मुळेच हे देखील त्यांनी नेटाने सांगितले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बोलताना प्रथम या निर्धार सभेचे उत्तम नियोजन केलं म्हणत घारे यांचे कौतुक केले. तर अजितदादांनी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन मंत्रिमंडळ स्थापन केलं. म्हणतानाच लेक लाडकी योजने बाबत अदिती तटकरे यांनी संकल्पना मांडत दादा आणि सगळ्या मंत्रिमंडळाने ती अस्तित्वात आणली त्यामुळे मुलींना खूप मोठा फायदा होणार आहे. तर, करून दाखवणं हे अजित पवार यांचं प्रतीक आहे असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी खासदार सुनील तटकरे हे बोलताना म्हणाले कि ४० वर्षांपूर्वी मी काँग्रेस पक्षाचा युवक अध्यक्ष असताना याचठिकाणी सभा घेतली होती. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी मी सभेत उभा आहे. मी अनेकदा या कर्जतमध्ये आलो सभा घेतल्या पण जे ४० वर्षात कुणाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं असे म्हणत त्यांनी सुधाकर घारे यांचे कौतुक केले. यासह शब्दाचा पक्का नेता अशी ओळख अजित पवार यांची आहे. तेव्हा सुधाकर घारे यांनी आपल्या कर्जतसाठीच्या भावना व्यक्त केल्या.कर्जतमध्ये जी जी गाव दरडप्रवण म्हणून घोषित आहेत. त्या बाबत आपण आपल्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन विभाग आहे. तेव्हा त्यांच्याशी बोलून आपण त्यावर निर्णय घेऊयात असे सांगितले. तर आजवरच्या इतिहासात जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात कोणाचं चांगलं काम झालं असेल तर ते सुधाकर घारे यांचं आहे, सुधाकर घारे जिल्ह्याच नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. तेव्हा तयार राहा म्हणत पक्षाच चिंतन शिबिर झालं तर पक्षाची गौरवशाली वाटचाल सुरू होते. तेव्हा आगामी काळात अजित पवार नावाचा झांजवत उद्या देशात होईल. तर कर्जतचा विकासच नाही तर आपण मांडलेल्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे देखील तटकरे यांनी शब्द दिला . तर लोकसभेमध्ये इतर ५ मतदारसंघ पेक्षा जास्त मताधिक्य कर्जत मधून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
तर अजित पवार म्हणाले कि रायगडला ऐतिहासिक वारसा आहे. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याच स्वप्न या रायगडच्या मातीत साकार केलं, त्याप्रमाणे आपण देखील निर्धार इथून करत आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारे चालणारा पक्ष आहे. त्यामुळे घड्याळ तेच वेळ नवी म्हणत आम्ही सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यात हरित पट्टा असल्याने येथील पर्यटन व्यवसाय कसा वाडीस लागेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तर विरोधकांनी माझ्या आजारपणाचे राजकारण केले गेली. मात्र मी काही लेचापेचा नाही असे म्हणत पवार यांनी विरोधकांना झापले.
दरम्यान याप्रसंगी शिवसेनेचे उल्हास भुर्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page