कोण आहे शोभना आशा? 5 विकेट्स घेत रचला इतिहास, रोमहर्षक सामन्यात RCBचा दोन धावांनी विजय…

Spread the love

दुसऱ्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा दोन धावांनी पराभव केला.

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) शनिवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात उत्साह शिगेला पोहोचला होता. दुसऱ्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा दोन धावांनी पराभव केला.

शोभना ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासाठी आशेचा किरण ठरली. या सामन्यात तिने पाच विकेट घेतल्या. यासह ती डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात पाच बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा करू शकला.

कोण आहेत शोभना आशा?

01 जानेवारी 1991 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम येथे आशा शोभनाचा जन्म झाला. तिचे वडील ऑटो ड्रायव्हर होते, पण त्यांनी आपल्या मुलीच्या क्रिकेटर होण्याच्या मार्गात आर्थिक अडचण येऊ दिली नाही. शोभना इंडिया ए वुमन, इंडियन बोर्ड प्रेसिडेंट्स वुमन इलेव्हन, केरळ आणि पुद्दुचेरी तसेच रेल्वेकडून खेळली आहे.

शोभना आशाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने WPL च्या पहिल्या हंगामात 10 लाख रुपयांना संघात घेतले होते. शोभनाच्या रूपाने आरसीबीला एक उत्तम गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळताना त्याने 5 सामन्यात 5 बळी घेतले होते. तिला बहुतांश सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण आता शोभनाने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत इतिहास रचला आहे.

शोभनाने एका षटकात 3 विकेट घेत सामचा फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्वेता शेरावत, चौथ्या चेंडूवर ग्रेस हॅरिस आणि सहाव्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून तिने सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर खिशात टाकला.

खरंतर, यूपी वॉरियर्स 17 व्या ओव्हरपूर्वी सामन्यात होती. 16व्या षटकापर्यंत 3 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत 4 षटकात विजयासाठी 32 धावांची गरज होती. युपी वॉरियर्स हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण शोभनाच्या घातक गोलंदाजीसमोर यूपी वॉरियर्स संघाची घसरण सुरू झाली. आरसीबीने शेवटच्या षटकात हा सामना 2 धावांनी जिंकला.

या 5 विकेट्ससह शोभना आशा WPL मध्ये 5 बळी घेणारी जगातील चौथी गोलंदाज ठरली आहे. सर्वात आधी अमेरिकेच्या तारा नॉरिसने गेल्या वर्षी 5 विकेट घेत इतिहास रचला होता. डब्ल्यूपीएलमध्ये 5 विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज होती. यासोबतच गेल्या वर्षी गुजरातच्या मॅरिझान कॅपने 15 धावांत 5 बळी घेतले होते. तर किम गर्थने 36 धावांत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता या यादीत शोभना आशा यांचे नाव जोडले गेले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page