आपल्याला जास्त रिटर्न तर हवा असतो मात्र जोखीम असल्यामुळे आपण मागे सरकतो. पण आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही तुम्हाला नो लॉस स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. हि स्ट्रॅटेजी वापरली तर अमरला म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक तर करता येईलच पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला कॅपिटलवर एक रुपयादेखील लॉस होणार नाही. चला तर हि स्ट्रॅटेजी नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
अमर मागच्या 3 वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय. तसेच, त्याची दर महिन्याला 20000 रुपयाची SIP देखील चालू आहे. पूर्वी अमरचा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्सवर विश्वास नव्हता. मात्र, एका मित्राच्या आग्रहाखातर त्याने कोविडच्या दरम्यान 20000 रुपयाची SIP चालू केली. दोन्ही SIP वर त्याला सातत्याने चांगला परतावा मिळाला म्हणून त्याचा कॉन्फिडन्स वाढला. मागच्या वर्षी पगारवाढ झाल्यावर त्याने SIP चा आकडा 25000 रुपये प्रति महिना केला. दुसऱ्या बाजूला तो मनी9 मराठीसारखे काही चॅनल फॉलो करतो आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. प्रत्येक शेअरमध्ये केवळ 5000 रुपयाची गुंतवणूक करायची अशी सोपी सरळ त्याची स्ट्रॅटेजी आहे. मागच्या 3 वर्षात त्याने जवळपास 40 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, म्हणजे त्याची मूळ गुंतवणूक झाली 40 गुणिले 5000 रुपये म्हणजे 2 लाख रुपये. यापैकी, काही शेअर्समध्ये त्याला थोडा लॉस झाला आहे तर काही शेअर्समध्ये खूप चांगला रिटर्न मिळाला आहे. त्याच्या इक्विटी पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन आता 5 लाखाच्या वर गेलं आहे. आता अमरला वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीतून 50 लाख रुपये मिळाले आहेत. हे भांडवल कुठे गुंतवायचं, याचा तो आता विचार करतोय.
अमरच्या मनात गुंतवणुकीचे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे खात्रीशीर रिटर्न देणाऱ्या बँक FD मध्ये गुंतवणूक करायची आणि दुसरा पर्याय म्हणजे हे भांडवल थोडी जोखीम घेऊन म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करायची. FD मध्ये गुंतवणूक केली तर साधारण 7 ते 8% व्याज मिळेल, मात्र अमरचं वार्षिक उत्पन्न 15 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, FD च्या व्याजावर त्याला थेट 30% इन्कम टॅक्स भरावा लागेल. इन्कम टॅक्स भरल्यावर त्याच्या हातात जेमतेम 5% राहतात, हा रिटर्न महागाईच्या दरापेक्षा कमी आहे. दुसऱ्या बाजूला म्युच्युअल फंड्समध्ये साधारण 12% आई शेअर्समध्ये 15 ते 18 % रिटर्न मिळू शकतो, मात्र यामध्ये खूप जास्त जोखीम आहे. उद्या जर काही कारणास्तव शेअर मार्केटमध्ये 40 50 % पडझड झाली तर खूप मोठं नुकसान होईल आणि कॅपिटल रिकव्हर व्हायला कमीतकमी 5 वर्ष लागतील. अमरच्या मनात जो गोंधळ आहे, तसाच गोंधळ प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. आपल्याला जास्त रिटर्न तर हवा असतो मात्र जोखीम असल्यामुळे आपण मागे सरकतो. पण आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही तुम्हाला नो लॉस स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. हि स्ट्रॅटेजी वापरली तर अमरला म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक तर करता येईलच पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला कॅपिटलवर एक रुपयादेखील लॉस होणार नाही. चला तर हि स्ट्रॅटेजी नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
अमरने 50 लाख रुपयाची एकरकमी गुंतवणूक आर्बिट्राज फंडमध्ये करावी असा आमचा सल्ला आहे. आर्बिट्राज फंड ही डेट फंडची कॅटेगरी आहे, त्यामुळे यामध्ये साधारण 6 ते 7% वार्षिक रिटर्न मिळू शकतो, पण खूप मोठे चढ उतार होत नाहीत. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या फंडवर इक्विटीप्रमाणे टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे, चांगला पोस्ट टॅक्स रिटर्न मिळतो.
तुमच्यासमोर जो चार्ट दिसतोय तो SBI आर्बिट्राज ऑपॉर्च्युनिटीजचा चार्ट आहे. हा चार्ट बघितल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे या फंडमध्ये लॉस होण्याची शक्यता खूपच कमी आहे. अमरला या फंडवर वार्षिक 6% रिटर्न मिळाला तर त्याला दर महिन्याला 25000 रुपयाचं व्याज मिळू शकतं. दर महिन्याला मिळणारं हे व्याज अमर इक्विटी फंड्समध्ये किंवा शेअर्समध्ये ट्रान्स्फर करू शकतो. म्हणजे थोडक्यात अमरला 50 लाखावर मिळणारं व्याज STP च्या मदतीने इक्विटीमध्ये ट्रान्स्फर करायचं आहे. असं केल्यामुळे, अमर त्याच्या मुद्दलीवर कोणतीही रिस्क घेत नाहीये. तो केवळ व्याजावर रिस्क घेतोय. त्याला पाहिजे तेव्हा तो त्याचे 50 लाख रुपये काढून घेऊ शकतो. अमरने पुढच्या 20 वर्षासाठी अश्या प्रकारे गुंतवणूक चालू ठेवली आणि त्याला या STP वर साधारण 15% व्याज मिळालं तर 20 वर्षानंतर इक्विटी पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल साधारण 3 कोटी 79 लाख रुपये.
त्याच्या पोर्टफोलिओची एकूण व्हॅल्यू होईल 3 कोटी 79 लाख अधिक आर्बिट्राज फंडमध्ये असणारे 50 लाख म्हणजे एकूण 4 कोटी 39 लाख रुपये. अमरने जर कोणतीच जोखीम घ्यायची नाही म्हणून हे पैसे FD मध्ये गुंतवले असते आणि त्याला पोस्ट टॅक्स 6% रिटर्न मिळाला असता तर 20 वर्षानंतर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य झालं असतं केवळ 1 कोटी 60 लाख रुपये. याचा अर्थ ही नो लॉस स्ट्रॅटेजी वापरून अमरला साधारण 2 कोटी 79 लाख रुपये अतिरिक्त फायदा होईल. अश्या प्रकारे तुमच्याकडे एखादी मोठी रक्कम असेल तर या स्ट्रॅटेजीचा वापर करा. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही स्ट्रॅटेजी नक्की शेअर करा