आरोग्य .. शिक्षण .. रोजगार याबाबत उदासीनता दाखविणारा खासदार काय कामाचा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची खासदार विनायक राउत यांच्यावर खरमरीत टिका…

Spread the love

ऱाजापूर / प्रतिनिधी – आरोग्य .. शिक्षण .. रोजगार याबाबत उदासीनता दाखविणारा खासदार काय कामाचा असा सणसणीत टोला केंद्रीयमंत्री ना नारायण राणे यान्नी विद्यमान खासदार विनायक राऊत यान्ना ओणी येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात लगावला . पक्षाने संधी दिल्यास रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढविण्याची तयारी असल्याचे केंद्रीयमंत्री ना राणे यान्नी स्पष्ट केले .
लोकसभा निवडणुक पार्श्वभुमीवर रत्नागिरीसिंधुदुर्ग मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नसली तरी दुसरीकडे मात्र भाजपाने या मतदारसंघावर आपली दावेदारी अधिक मजबूत करताना राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी ओणी येथील श्री गजानन मंगल कार्यालयात भव्य सभा आयोजीत करुन प्रचाराचे रणशिंग फुंकले .ना .ऱाणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडलेल्या सभेला व्यासपिठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री ना . नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे माजी आमदार बाळ माने ,माजी आमदार आणि या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार ,प्रदेश सचीव सौ शिल्पा मराठे राजापूर विधानसभा प्रभारी उल्काताई विश्वासराव ,जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ,ना . ऱाणेंच्या सुविद्य पत्नी सौ निलम राणे ,तालुकाध्यक्ष (पुर्व )भास्कर सुतार आणि तालुकाध्यक्ष (पश्चीम ) सुरेश गुरव माजी तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव ,जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते .

मतदारसंघातुन भाजपाचा खासदार निवडुन द्यायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यान्नी जोमाने कामाला लागा- नारायण राणे…

आपल्या तडाखेबंद भाषणात उद्योग मंत्री नारायण राणे यान्नी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,कॉंग्रेसचे नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी , खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवींवर सडकुन टिका केली . कोकणात आलेल्या विकास कामान्ना विरोध करण्याचे काम केले .सी वल्ड प्रकल्पाला याच मंडळीन्नी विरोध केला . जनतेची माथी भडकवली . जर तो प्रकल्प मार्गी लागला असता तर आज वाढत्या बेरोजगारीवर मात करता आली असती . अनेक बेरोजगारान्ना रोजगार उपलब्द झाले असते असे ते पुढे बोलताना म्हणाले ..

मागील दहा वर्षात कोणती विकासाची कामे केली ती सांगा…

मागील दहा वर्षात या मतदारसंघात कोणती कामे खासदार म्हणुन केलीत ते सांगा असे आवाहन त्यान्नी विनायक राऊत यान्ना दिले .दहा वर्षात एकही विकास कामे न करणाऱ्या विनायक राऊत यान्नी स्व : ताच्या नावाने मात्र हातिवले येथील टोल नाक्याचे कंत्राट मिळविले .एखाद्या गरीबाच्या संस्थेला ते कंत्राट का नाही मिळवुन दिले असा कडा सवाल त्यान्नी राऊत यान्ना विचारला तर मागील सत्तर वर्षात देशात सत्ता भोगणाऱ्यान्ना आता जनतेचा कळवळा कसा आला अशा शब्दात त्यान्नी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला .

मोदींसारखा पंतप्रधान लाभल्याने भारत देशाने जगात आपला दबदबा निर्माण केला…

आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात त्यान्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दशकातील कामाचा गौरव केला. मोदींसारखा पंतप्रधान लाभल्याने भारत देशाने जगात आपला दबदबा निर्माण केला आहे देशाच्या जीडीपीत वाढ झाली आहे . देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावर आली आहे . आपल्या मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदीन्नी पाच लाख कोटी रुपये दिल्याचे त्यान्नी पुढे बोलताना सांगितले कोविडच्या काळात देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य पुरविले . कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे .येथे रोजगारासाठी उद्योग यावेत्त म्हणुन आमचे प्रयत्न सुरु आहेत त्यासाठी दोडामार्ग येथे सुमारे बाराशे एकर जागेत पाचशे वीस कारखाने आणायचे आहेत असे त्यान्नी स्पष्ट केले या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचा खासदार निवडुन द्यायचा आहे त्यासाठी कार्यकर्त्यान्नी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यान्नी केले . शिक्षण आरोग्य रोजगार पर्यटन आदी क्षेत्रात या जिल्ह्यात चांगले काम होणे अपेक्षीत आहे या जिल्ह्यातील तरुण आयएएस सारख्या परीक्षांत उत्तीर्ण होवुन या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणुन यावा अशी अपेक्षा त्यान्नी व्यक्त केली .

मागील दहा वर्षात विद्यमान खासदार व आमदार यांनी विकास कामे न करता विकासाला विरोध करण्याचे काम- निलेश राणे.

माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष निलेश राणे यान्नी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवींवर जोरदार टिका केली . मागील दहा वर्षात केवळ मते घेण्याचेच काम त्यान्नी केले . विकास कामे न करता विकासाला विरोध करण्याचे काम त्यान्नी केले. सुमारे तीन लाख कोटींचा रिफायनरीप्रकल्पाला विरोध करुन विरोधकान्नी कोकणचे आतोनात नुकसान केले .केवळ विरोध करणे चुकीची माहिती पसरवुन जनतेची माथी भडकावणे हेच धंदे यान्नी केले जैतापूर प्रकल्पाला विरोध करुन राजन साळवी आमदार झाले असाही आरोप माजी खासदार निलेश राणे यान्नी केला . या तालुक्यात आलेल्या आयलॉग सह रिफायनरी प्रकल्प मार्गी न लागल्याने येथील जनतेचे मोठे नुकसान झाल्याची खंत देखील त्यान्नी व्यक्त केली .तालुक्यातील बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना त्यान्नी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला रिफायनरीला विरोध करणाऱे अनेक उद्योग आणण्याची भाषा करीत होते . प्रत्यक्षात त्यान्नी किती प्रकल्प आणलेत्याचे काय झाले असा टोला त्यान्नी लगावला

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचाच खासदार आपल्याला निवडुन द्यायचा- बाळ माने..

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माजी आमदार व रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी प्रमोद जठार यान्नी ६ एप्रिल या भाजपाच्या स्थापना दिनाचे महत्व विषद करताना अबकी बार चारसो पार अशी घोषणा करताना प्रामुख्याने तीन गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीन्ना पंतप्रधान बनविणे , देशात चारशे पार सीट्स निवडुन आणणे आणि या मतदार संघातुन भाजपचाहक्काचा खासदार निवडुन आणणे अशी उद्दीष्ट्ये असल्याचे त्यान्नी सांगितले
माजी आमदार बाळ माने यान्नी या मतदारसंघातुन भाजपचाच खासदार आपल्याला निवडुन द्यायचा असल्याचे सांगितले .भाजपच्या मेळाव्याला तालुक्यातुन मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते उपस्थीत होते . रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील प्रचंड चुरशीमुळे अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना भाजपने मतदारसंघात सभान्ना सुरवात करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे .

मतदारसंघ भाजपला मिळावा आणि राणेसाहेबान्नी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे- राजेश सावंत..

आपल्या प्रास्ताविकांत जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यान्नी तालुक्यातील बहुचर्चीत रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा उपस्थीत करुन वाढत्या बेरोजगारीबाबत उपस्थीतांचे लक्ष वेधताना मागील दहा वर्षे निष्क्रीय खासदार ,आमदारान्ना घरचा रस्ता दाखवायचा आहे असे निक्षुन सांगितले तर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यान्नी मनोगत व्यक्त करताना हा मतदारसंघ भाजपला मिळावा आणि राणेसाहेबान्नी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे अशी भावना व्यक्त करताच उपस्थीतान्नी टाळ्यांच्या गजरात गडगडाट केला .जनतेला न्याय द्यायला असेल आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे त्यान्नी ठासुन सांगितले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page