उद्धव ठाकरे समर्थक अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, फेसबुक लाइव्ह दरम्यान गोळीबार

Spread the love

दबाव वृत्त

मॉरिस नोरोन्हा हे दहिसरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते, त्यातून त्यांच्यात वाद होता, असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतल्या दहीसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसंच ते मुंबै बँकेचे संचालकदेखील होते. घोसाळकर पितापुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत.

जेजे हाॅस्पिटलमध्ये पोस्ट माॅर्टमनंतर मृतदेह दहिसर येथील त्यांच्या घरी आणला आहे. आज शुक्रवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर, आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ते लिहितात, “अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना ह्या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.”

मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही घटना चुकीची घडलेली आहे. अशा घटना घडू नये अशा मताचे मी पण आहे. पण तुम्ही मी गप्पा मरतोय. संभाषण स्पष्ट आहे. संभाषण ऐकल्यावर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत असं स्पष्ट आहे. उठताना घोसाळकर म्हणतात, आम्ही बस घेऊन जाणार. घटना काळीमा फासणारी आहे. बाहेर पोलीस असेल तरी आत लोक धंदा-पाण्याचा गप्पा करतायेत. एक जण हाफ चड्डीत दिसतोय त्यात. नेमके काय याचा तपास झाला पाहिजे. विरोधकांना निमित्त मिळाले आहे. आम्ही नाकारत नाही. तू आणि मी एका खोलीत थांबलो तर सिक्युरिटीला बाहेर थांबा तर ते बाहेर थांबणार. मी कोणाचे समर्थन करतो असा अर्थ काढू नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा वर जाऊन चर्चा केलेली आहे.”

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page