
ठाणे : निलेश घाग दिवा येथील साबे-गाव भागात रात्रीच्या सुमारास विजेचा झटका लागून दोनजण जखमी झाले. सुरज गुरव (२१) आणि आशुतोष कुमार (२२) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साबेगाव येथे सुरज आणि आशुतोष राहतात. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोघेही येथील महापालिका शाळेच्या परिसरातून पायी जात होते.

त्यावेळी टोरंट कंपनीच्या विद्युत तारांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. त्यावेळी या वीजेच्या तारेच्या संपर्कात येऊन सुरज आणि आशुतोष यांना विजेचा झटका बसला. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जाहिरात

