
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे
रखडलेल्या कामाबद्दल तसेच डंपर व इतर वाहनांतून गच्च भरून वाहतूक करणाऱ्या गाड्यांची चौकशी करावी या मागणीसाठी लवकरच संगमेश्वर मधील ग्रामस्थ आणि पत्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांची वाहतूक कॅम्पर गाडी व डंपर मधून करण्यात येते.
मुंबई गोवा मार्गावरती गेली अनेक वर्ष काम चालू आहे. जे एम म्हात्रे कंट्रक्शन कंपनी ही आरवली ते तळेकांटे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत. गेली अनेक वर्ष हवेवर काम करणारे मजूर व कर्मचारी यांची कॅम्पर मधून व डंपर मधून प्रवासी वाहतूक चालू आहे. आरटीओ चे नियम धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत. आज पर्यंत अनेक अपघात झाले. प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रवासी वाहने वापरणे गरजेचे आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरकडे एकही प्रवासी वाहतूक करणारी गाडी नाही. व कारवाई का करण्यात आली नाही याचे उत्तर प्रशासनाकडे नाही याविरुद्ध लेखी कंप्लेंट दाखल होऊ नये उडवाउडीची उत्तर देण्यात येतात. प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये हितसंबंध असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते लवकरच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार या विषयांमध्ये खुलासा करणार आहेत या संदर्भात पडले व्हिडिओ असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


मुंबई गोवा हायवे वरती शास्त्री फुल ते तळेघंटी दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य…
मुंबई गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्ष काम चालू आहे जे म्हात्रे कंट्रक्शन कंपनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहे. पावसाळा गेल्यानंतर लगेच कंपनीला खड्डे भरण्याची पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी ने दिले होते परंतु अनेक दिवस खड्डे भरण्यात येत नव्हते. एक मृत्यू झाल्यानंतर खड्डे भरायला सुरुवात झाली . एवढी मजुरी गिरी कॉन्ट्रॅक्टरची आहे. एवढा मनमारी कारभार कॉन्ट्रॅक्टर का करतो याचं जाब अधिकारी का विचारत नाही सहज प्रश्न पडतो. लवकरच प्रशासनाला जागा आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आंदोलन करणार आहेत.










काम सुरू आहे मात्र हे काम करताना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे करीत असताना अनेक ठिकाणी पुरेशी
सुरक्षा नाही तसेच चौपदरीकरणाची कामे करणाऱ्या अनेक वाहनांना नंबरच नसल्याचे दिसत आहेत. वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विना परवाना कामगारांची वाहतूक होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत नाही. या संदर्भात लवकरच संगमेश्वरमधील पत्रकार आणि ग्रामस्थ पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भेटून कैफियत मांडणार आहेत.






ड्रायव्हरच्या व कर्मचारी यांच्या कागदपत्रांचे वेरिफिकेशन नाही…
मुंबई गोवा महामार्गावर ती अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ड्रायव्हर लोकांचे लायसन नाहीत. प्रत्येक वेळेला ड्रायव्हर एक्सीडेंट झाले की पळून जातात. खोटा ड्रायव्हर दाखवून कागदपत्रे रंगवण्यात येतात. त्यामुळे कागदपत्रांचे वेरिफिकेशन करणे हे स्थानिक पोलीस स्टेशनचे काम आहे किंवा त्यांचे कागदपत्र जमा करून घेतले पाहिजे परंतु ते करण्यात येत नाही विभाग भरपूर चिंताजनक आहे. स्थानिक प्रशासनाने कागदांच्या वेरिफिकेशन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची आहे.