आजचे राशिभविष्य : सुट्टीचा दिवस तुमच्यासाठी असेल खास; वाचा आजचे राशीभविष्य…

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ आजच्या राशिभविष्यातून

▪️मेष (ARIES) : आज कुंभ राशीचा चंद्र आपल्या लाभात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी आणि स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.

▪️वृषभ (TAURUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आपल्या दशम भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान-सन्मान प्राप्त झाल्यानं मन प्रसन्न होईल.

▪️मिथुन (GEMINI) : आज कुंभ राशीचा चंद्र आपल्या भाग्यात असेल. मानसिकदृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील. शरीरानं थकाल आणि आळसामुळं कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणं हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

▪️कर्क (CANCER) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टम भावात असेल. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामापासून शक्य तितके दूर राहावे.

▪️सिंह (LEO) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार आणि व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.

▪️कन्या (VIRGO) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भागात असेल. आज उत्साह आणि स्वास्थ्य उत्तम राहील. घरी आणि नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल.

▪️तूळ (LIBRA) : आज कुंभ राशीचा चंद्र आपल्या पाचव्या भावत असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद-विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.

▪️वृश्चिक (SCORPIO) : आज कुंभ राशीचा चंद्र आपल्या चौथ्या भावात असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्तानं घालवावा. चिंतातुर मन आणि अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत.

▪️धनू (SAGITTARIUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान – सन्मान होतील.

▪️मकर (CAPRICORN) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचं नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावं.

▪️कुंभ (AQUARIUS) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळं आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील.

▪️मीन (PISCES) : आज कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page