आज’या’ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ फलदायी?; वाचा राशीभविष्य…

Spread the love

दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ  राशीभविष्यात.

मेष (ARIES) : आज सिंह राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भागात असेल. आज स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्यानं नैराश्य येईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळं हैराण व्हाल. प्रवासात अडथळं येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल.

वृषभ (TAURUS): सिंह राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भागात असेल. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल. वडिलांकडून संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील. कला, क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना आपले कसब दाखविण्याची संधी मिळेल. संततीविषयक कामावर खर्च होईल.

मिथुन (GEMINI) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भागात असेल. आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी-पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील.

कर्क (CANCER) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भागात असेल. आज गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात निर्माण होतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. अवैध प्रवृत्तीकडं झुकणार्‍या मनाला काबूत ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अपेक्षित सफलता मिळणार नाही.

*सिंह (LEO) :* सिंह राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप आणि वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखी, पोटाचे आजार बळावतील. दांपत्य जीवनात माधुर्य राहील.

कन्या (VIRGO) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भागात असेल. आपल्या अहंपणामुळं आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक, मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळं काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. मांगलिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कोर्ट-कचेरी आणि नोकरांपासून जपून राहावं लागेल.

तूळ (LIBRA) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस शुभफलदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. पत्नी आणि संतती यांच्याकडून सुखा-समाधानाचा अनुभव येईल. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचं वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी – व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उच्च अधिकारी व वडीलधार्‍यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल. संततीकडून समाधान मिळेल. मान – प्रतिष्ठा वाढेल.

धनू (SAGITTARIUS) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपणाला प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. कामात उत्साह राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी – व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी व विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नये.

मकर (CAPRICORN) : सिंह राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळं अनेक संकटांपासून वाचाल. आहारावर विशष लक्ष न दिल्यास प्रकृती बिघडेल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ (AQUARIUS) :

सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भागात असेल. आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्यानं कामात यश मिळणं सहज शक्य होईल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र, वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन (PISCES) :

सिंह राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भागात असेल. मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करेल. कुटुंबात सुख-शांती, आनंदाचं वातावरण राहील. रागवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page