
मुंबई / प्रतिनिधी- यंदा घरोघरी गुढी उभारण्यासाठी सूर्याेदयापासून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त आहे. यंदा रवी, बुध, शुक्र, शनी आणि राहू हेपाच ग्रह एकत्र आल्याने गजकेसरीयोग, अमृतसिद्धी योग जुळून आल्याचे ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले.
गुढीपाडवा या दिवशी शालिवाहनशक प्रारंभ होतो. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणना सुरू केल्याचा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये आहे. उत्तम आरोग्य,ऐश्वर्य प्राप्तीसाठी मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर, कडुनिंबाच्या कोवळ्या पुष्पासहित पानाचे चूर्ण चिंचेच्या पाण्यात काढून सर्वांनी भक्षण करावे. यामुळे आयुष्यवृद्धी होते. सौभाग्याची वाढ होऊन सर्व प्रकारची शांती लाभते असे पुराणांत वर्णन केले आहे.
वासंतिक नवरात्राला प्रारंभ-
गुढीपाडव्यापासून वासंतिक नवरात्रालादेखील आरंभ होतो. ज्याप्रमाणे भगवतीची उपासना करतो त्याचप्रमाणे या वासंतिक नवरात्रात आपल्या कुलदेवतेची उपासना करावी. – अनंत पांडव गुरुजी
सकारात्मक ऊर्जा पसरवतो
बांबू हा आतून पोकळ असतो व वेळू हा मजबूत असतो. मंदिरावर कलश असतो तो देखील पालथाच घातला जातो. कारण त्या कलशाचे टोक आकाशमंडलांमधील सकारात्मक ऊर्जा खेचून घेते व ते मंदिरामध्ये ऊर्जा प्रवाहित करते. तशी ब्रह्मांडातली वैश्विक ऊर्जा चांदी, तांबे, पितळ या धातूचा जो कलश गुढीवरती पालथा घालतो तो कलश ती ब्रह्मांडातली ऊर्जा खेचून सकारात्मक ऊर्जा पसरवतो. परिसरात नकारात्मक ऊर्जा राहू नये, बॅक्टेरियल काउंट राहू नये म्हणून लिंबाची पाने लावली जातात.
*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर असे असेल राशिफळ*
▪️मेष : सरकारी कामांत यश, आमिषाला बळी पडू नका, सत्कर्म करा.
▪️वृषभ : नोकरी-व्यवसायामध्ये बढती, प्रलंबित कामे पूर्ण होतील.
▪️मिथुन : प्रमोशन, नवीन व्यवसाय-नोकरीमध्ये यश मिळेल.
▪️कर्क : दूरचे प्रवासाचे योग
▪️सिंह : कौटुंबिक समस्याकडे योग्य तो समतोल ठेवावा, नोकरीनिमित्त स्थलांतर होण्याची शक्यता.
▪️कन्या: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
▪️तूळ : व्यवसाय-नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे पाठबळ मिळेल.
▪️वृश्चिक : आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. एकंदरीत संमिश्र प्रकारचा काळ असेल.
▪️धनु: वास्तुयोग, वाहनयोग,कामाच्या ठिकाणी स्थानबदलदेखील योग जुळून येईल.
▪️मकर : येणारा काळ प्रगतीचा, भरभराटीचा असेल. पैशाची चणचण दूर होईल.
▪️कुंभ : आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल येणारा काळ.
▪️मीन: नोकरी-व्यवसायात बदल घडतील.