नेरळ/सुमित शिरसागर- नेरळ येथील हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून सिद्धगड बलिदान दिनी सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी व्यक्तीला हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षी मे २०२३ मध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वत उंच शिखर सर करणारे कर्जत येथील गिर्यारोहक संतोष दगडे यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतीय थळ सेनेतील निवृत्त जवान कुमार जाधव आणि निवृत्ती निलधे पाटील यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समिती कडून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.या समितीकडून दारावसरही हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिन २ जानेवारी रोजी साजरा केला जातो.सिद्धगड बलिदान दिनी आयोजित अभिवादन सभेत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी देशाची मान सन्मानाने उंचावणारे गिर्यारोहक संतोष दगडे यांना देण्याचे जाहीर केले आहे. संतोष दगडे यांनी मे २०२३ मध्ये जगातील सर्वात उंच असलेले माउंट एव्हरेस्ट सर केला होता.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन गिर्यारोहक संतोष दगडे यांना यावर्षीचा हुतात्मा गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
त्या कार्यक्रमात भारतीय थळ सेनेतील निवृत्त जवान कुमार जाधव आणि निवृत्ती निलधे पाटील यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून माजी आमदार सुरेश लाड, कर्जत चे प्रांत अधिकारी अजित नैराळे,तहसीलदार डॉ शीतल रसाळ,नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी,उप सरपंच मंगेश म्हसकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे हे प्रमुख उपस्थित होणार आहे.
हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून यापूर्वी महान कला दिग्दर्शक नितीन देसाई ,कविवर्य पदमश्री नारायण सुर्वे, पदमश्री पोपटराव पवार,मॅगसेसे अवॉर्ड विजेते डॉ भरत वाटवानी,आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार पराग बोरसे,२६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील शहीद योगेश पाटील,कृषिभूषण शेखर भडसावळे, आदिवासी कार्यकर्त्या ठमाबाई पवार,इतिहास संशोधक वसंत कोळंबे,सार्वजनिक रक्तदाते राजेश कोठारी,स्वतंत्रपूर्व काळातील शिक्षक वि रा देशमुख,अभिनेते अरुण नलावडे,कवी अरुण म्हात्रे,डॉ नंदकुमार तासगावकर यांच्याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सनमानचिन्ह,मानपत्र,शाल ,श्रीफळ आणि झाडाचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप असते.