१ सप्टेंबरपासून होणार ‘हे’ १० मोठे बदल

Spread the love

नवी दिल्ली :- १ सप्टेंबरपासून देशात अनेक नियमांत बदल होणार आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.
केंद्रीय कॅबिनेटमध्ये अलीकडेच उज्ज्वला योजनेतील सिलेंडरवर २०० रुपये अनुदान जाहीर केले. त्यामुळे आधीचे २०० आणि आता २०० मिळून ४०० रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त होणार आहे. सरकारने हा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर बुकींग कराल तेव्हा प्रति सिलेंडर २०० रुपये तुमचे वाचतील.
तुमच्याकडेही २ हजारांची नोट अजून असेल तर ती बदलण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे बँकांची सुट्टी पाहून तुम्ही लवकरात लवकर तुमच्याकडील २ हजारांची नोट बदलून घ्या. असं नाही केले तर ३० सप्टेंबरनंतर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर हे काम कुठल्याही परिस्थितीत १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा. UIDAI नं १४ सप्टेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत दिली आहे. सुरुवातीला ही सुविधा १४ जूनपर्यंत होती परंतु त्यानंतर ती १४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे वरील तारखेपर्यंत तुम्ही आधारशी संबंधित कुठलेही बदल विनाशुल्क करू शकता.
जर तुम्हीही डिमॅट खात्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर हे काम ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी करून घ्या. कारण विना नॉमिनेशन असणारी खाती त्यानंतर सेबीकडून बंद केली जातील. त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसू शकतो.
जर तुमच्याकडे एक्सिक बँकेचे मॅग्नस क्रेटिट कार्ड असेल तर सप्टेंबर महिन्यापासून नियमांत बदल होत आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, काही व्यवहारांवर सप्टेंबर महिन्यापासून विशेष सूटचा लाभ घेता येणार नाही. त्यासोबत १ सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्क म्हणून १२५०० जीएसटीसह भरावे लागतील. तर जुन्या ग्राहकांना १० हजार रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. जे ग्राहक संपूर्ण वर्षात २५ लाखांपर्यंत खरेदी करतील त्यांना ते शुल्क माफ केले जाईल.
जर तुम्हाला एसबीआयच्या वीकेअर स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर केवळ ३० सप्टेंबरपर्यंत करू शकता. ही खास स्कीम ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपुष्टात येईल.एसबीआयच्या या योजनेचा लाभ केवळ ज्येष्ठ नागरिकांना घेता येतो. या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्यांच्या तुलनेत ५ वर्ष आणि त्याहून अधिक काळासाठी ७.५० टक्के व्याज मिळते.
पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्याबाबत मोठी अपडेट आहे. जर कुणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केले नाही. तर त्याचे पॅन कार्ड १ ऑक्टोबरपासून बंद होईल. जर तुमचे पॅन आधारकार्डशी लिंक नसेल तर तुमचे डिमॅट अकाऊंटवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे हे गरजेचे काम लवकर आटोपून घ्या.
IDBI बँकेच्या अमृत महोत्सव एफडी योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ ला संपेल. ३७५ दिवसाच्या या योजनेत लोकांना ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज मिळणार आहे. त्याचसोबत ४४४ दिवसांसाठी एफडी ठेवली तर ७.१५ टक्के आणि ज्येष्ठांना ७.६५ टक्के व्याज मिळू शकते.
दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेल दराचा आढावा घेतात. सप्टेंबर महिन्यात येणारे सण उत्सव पाहता लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर दिर्घ काळानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत बदल झालेला दिसू शकतो. इंधन दर कमी करण्याचा पर्याय सरकारकडे आहे असं तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे जर हे बदल झाले तर सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा मिळू शकतो.
सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. आता सीएनजी, पीएनजी ग्राहकांनाही सरकार सप्टेंबर महिन्यात दिलासा देऊ शकते. महागाई कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच याचा खुलासा होईल. दर महिन्याला सीएनजी-पीएनजी दरात बदल होतो, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात हे बदल सर्वसामान्यांना सुखावणारे ठरतील अशी आशा आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page