अशी संधी मिळणार नाही! भारतीय पोस्टात 10वी पाससाठी बंपर भरती, आताच अर्ज करा..

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाकडून भरती सुरु आहे. विशेष दहावी उत्तीर्णांसाठी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती प्रक्रिया 78 पदांसाठी होत आहे.

त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

पदाचे नाव आणि पात्रता :

ही भरती ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांसाठी राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेव्दारे एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण. असावा सोबतच Driving Licens+ हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा

पगार :

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- ते 63,200/- पर्यंत पगार मिळेल

निवड प्रक्रिया:..

स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

असा करा अर्ज..

उमेदवारांना हार्ड कॉपी कागदपत्रांसह व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page