
श्रीकृष्ण खातू / धामणी- यशाला शॉर्टकट नसतो पथक परिश्रम करून यशस्वी व्हा . यश मिळवणे सोपे असते पण ते टिकवणे कठीण असते. ते टिकवा. इतरांवर सत्ता गाजवणे सोपे, पण स्वतःवर सत्ता गाजवणे कठीण असते. म्हणून स्वतःच्या मतावर सत्ता गाजवून सुयोग्य दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला तर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पालकांनी आपल्या पाल्याला फक्त पैशाच्या मागे धावायला न लावता समाजासाठी योगदान ही देणारा माणूस घडवा अशा प्रकारचे मार्गदर्शनात रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील खावडी येथील श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दामिनी दयानंद भिंगार्डे यांनी मौलिक विचार मांडले.



वैश्य विद्यावर्धक समाज मुंबई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा गिरगाव मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. अशा राज्य पातळीवरील कार्यक्रमास ग्रामीण भागातील एका शिक्षिकेला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थी व पालकांना करिअरच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास निमंत्रित दयानंद भिंगार्डे, संस्था अध्यक्ष एडवोकेट सदानंद चिखले, चिटणीस प्रमोद लेंढे, उपाध्यक्ष यदुनाथ बर्डे, खजिनदार शेखर शेट्ये, विश्वस्त अविनाश कामेरकर, विनोद शेट्ये, कार्यकारणी सदस्य शिरीष शेट्ये, शैलेश नारकर, शेखर गांधी, संजय गांगण, वैश्य विद्यावर्धक समाज विद्यार्थी विद्यार्थिनी, व समाज बांधव उपस्थित होते.