मुंबई गोवा हायवे वरती तुरळ येथे दुचाकींच्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू , तुरळ व धामापूर गावावर शोककळा….वाहन चालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महामार्गाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

Spread the love

संगमेश्वर /प्रतिनिधी- दि 18 मार्च – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या जोराची धडकेत दोघेजण जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात तुरळ येथील गणेश मंदिराच्या नजीक घडला. तुरळ येथील सुरज फडकले (३५) आणि धामापूर येथील संदेश भोजने (४०)  हे दोघे ठार झाले आहेत
    
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक्टिवा व युनिकॉर्न या दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने दुचाकीस्वार दोघेही फेकले गेले. यातील एक्टिवा दुचाकीचा नंबर एमएच ०८ बीए ७१६२ तर युनिकॉर्न गाडीचा नंबर एमएच ०८ एएम ६९६४ असा आहे. या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाल्याने  एक दुचाकीस्वार जागीच मृत झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला.

महामार्गाचे काम चालू असताना अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष….

सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर पट्ट्यामध्ये काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी खरंतर दोन्ही मार्गिका काही काळ सुरू होत्या. काही वेळा काम सुरू असताना एक मार्गिका बंद ठेवून डायव्हर्शन करण्यात येते. यात कधी वाहन चालकांचा देखील गोंधळ उडतो. अशीच परिस्थिती या अपघातात झाली असावी अशी एकच चर्चा अपघाता दरम्यान ऐकायला मिळत होती.त्यामुळे काम सुरु असताना ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे बनले . सेफ्टी ऑफिसर किंवा कर्मचारी यांचे कामावरती कधीही दिसून येत नाहीत. तसेच साई कन्सल्टंट यांचेही कर्मचारी कामावर दिसून येत नाहीत अपघातच संदर्भ मध्ये पूर्व सूचना संबंधित एजन्सीने देणे गरजेचे असते किंवा झालेल्या अपघाताचे राष्ट्रीय महामार्गाला कळवणे गरजेचे असते तेही दिसून येत नाही.
    
नागरिकांची सामाजिक बांधिलकी अपघाता वेळी आली दिसून…

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज लक्षात घेता कडवई येथील सूरज चव्हाण यांनी आपल्या खाजगी गाडीतून गँभीर जखमी असलेल्या सुरज फडकले याना तर चिखली येथिल बंड्या मयेकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून संदेश भोजने याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले . मात्र दोघांचाही मृत्यू झाला . तेथील ग्रामस्थ अपघातास्थळी जमा झाले. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 कॉन्ट्रॅक्टर व जबाबदार अधिकारी यांच्यावर सदस्य मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा…

अपघातास महामार्गाच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असून या ठेकेदारावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वारंवार मुंबई गोवा हायवे वरती अपघातांची शुंकला चालूच आहे. यापूर्वीही सदर विषयांमध्ये अनेक पत्रव्यवहार झालेले असून सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये पत्रे पोलीस स्टेशन संगमेश्वर व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत परंतु सदर विषयांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. असे दिसून आलेले आहे. कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, परिवहन अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन करत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना अधिकाऱ्याने कोणती उपाययोजना केलेली नाही व संबंधित एजन्सी रिपोर्टही करत नाही. हे निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळे सर्वांवर सदस मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

तुरळ येथे दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात; दोन तरूणांचा मृत्यू

दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होवून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई- गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे काल सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तुरळ येथील सुरज फडकले (वय-२८) आणि धामापूर येथील संदेश भोजने (वय-४०) या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा पसरली असून फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा; फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अपघाताची बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तर सुरज आणि संदेशला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषीत केले. ऐन शिमगोत्सवात दोन तरूणांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने तुरळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर तुरळ आणि धामापूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर परिसरात काम सुरू असल्याने वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन संगमेश्वर पोलीसांकडून करण्यात आले आहे. तर महामार्ग ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई गोवा वा महामार्गाचे संगमेश्वर पट्ट्यामध्ये काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी खरंतर दोन्ही मार्गिका काही काळ सुरू होत्या. काही वेळा काम सुरू असताना एक मार्गिका बंद ठेवून डायव्हर्शन करण्यात येते. यात कधी वाहन चालकांचा देखील गोंधळ उडतो. अशीच परिस्थिती या अपघातात झाली असावी अशी एकच चर्चा अपघाता दरम्यान ऐकायला मिळत होती.त्यामुळे काम सुरु असताना ठेकेदार कंपनीने योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
    
स्थानिक नागरिकांची सामाजिक बांधिलकी अपघाता वेळी आली दिसून…

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज लक्षात घेता कडवई येथील सूरज चव्हाण यांनी आपल्या खाजगी गाडीतून गँभीर जखमी असलेल्या सुरज फडकले याना तर चिखली येथिल बंड्या मयेकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून संदेश भोजने याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले . मात्र दोघांचाही मृत्यू झाला . तेथील ग्रामस्थ अपघातास्थळी जमा झाले. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 कॉन्ट्रॅक्टर व जबाबदार अधिकारी यांच्यावर सदस्य मनुष्यदाचा गुन्हा दाखल करावा…

अपघातास महामार्गाच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असून या ठेकेदारावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वारंवार मुंबई गोवा हायवे वरती अपघातांची शुंकला चालूच आहे. यापूर्वीही सदर विषयांमध्ये अनेक पत्रव्यवहार झालेले असून सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये पत्रे पोलीस स्टेशन संगमेश्वर व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत परंतु सदर विषयांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. असे दिसून आलेले आहे. कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, परिवहन अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन करत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना अधिकाऱ्याने कोणती उपाययोजना केलेली नाही व संबंधित एजन्सी रिपोर्टही करत नाही. हे निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळे सर्वांवर सदस मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.

तुरळ येथे दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात; दोन तरूणांचा मृत्यू

दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होवून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई- गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे काल सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तुरळ येथील सुरज फडकले (वय-२८) आणि धामापूर येथील संदेश भोजने (वय-४०) या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा पसरली असून फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत केला पंचनामा

याबाबत संगमेश्वर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज फडकले हा आपल्या ताब्यातील युनिकाँन ही दुचाकी घेवून तुरळ ते आरवली असा प्रवास करत होता. तर संदेश भोजने हा अँक्टीव्हा घेवून आरवलीहून तुरळच्या दिशेने येत होता. दोन्ही गाड्या तुरळ गणपती मंदिराजवळ आल्या असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, सुरज आणि संदेशचा यामध्ये मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे परि. उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे, उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, उपनिरीक्षक विवेक साळवी, पो. हे. काँ. सचिन कामेरकर, हे. काँ. विश्वास बरगाळे, पो. काँ. सोमनाथ खाडे आदिंनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला.

ऐन शिमगोत्सवात तुरळ व धामापूर गावावर शोककळा; फडकले आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर..

अपघाताची बातमी समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तर सुरज आणि संदेशला संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषीत केले. ऐन शिमगोत्सवात दोन तरूणांचा अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने तुरळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर तुरळ आणि धामापूर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर परिसरात काम सुरू असल्याने वाहनचालकांनी वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन संगमेश्वर पोलीसांकडून करण्यात आले आहे. तर महामार्ग ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Author

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page