रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यात यश; तब्बल ४५ मोबाईल शोधून पोलिसांनी मूळ मालकांना केले परत..

Spread the love

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तब्बल ४५ मोबाईल शोधून पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर, म.पोहवा दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पो.हवा. रमिज शेख, पो. शी. निलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापुर, सावर्डे, देवरुख या पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांनी एकत्रित काम केले. तक्रारीवरून प्राप्त माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यातील गहाळ मोबाईलचा शोध घेतला. ही कारवाई रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या प्रक्रियेमध्ये पोलीस दलाने एकूण ४५ मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळविण्यात यश आले आहे. मिळविण्यात आलेले गहाळ मोबाईल मूळ मालकांना सोमवारी ०८ एप्रिल २०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते परत देण्यात आले. यावेळी एकूण २७ मूळ मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले असून उर्वरीत सर्व मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल सायबर पोलीस ठाणे येथून घेऊन जाण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page