गिरगाव पाडवा रॅलीत ‘निवडणुकीचे रंग’, मतदान जनजागृती करणारे आकर्षक चित्ररथ…

Spread the love

गुढीपाडव्याला गिरगाव परिसरात चित्ररथ काढण्याची परंपरा आहे. या वर्षी या चित्ररथात वेगवेगळ्या विषयावर चित्ररथ काढण्यात आले आहेत.

मुंबई – लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीच्या वातावरणात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. गिरगावात गुढीपाडवा विशेष आकर्षण असतं. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी गिरगावच्या पाडव्या रॅलीत सहभागी होतात. यावर्षी गिरगावच्या पाडवा रॅलीत निवडणुकीचे रंग पाहायला मिळत आहेत. यावर्षी पाडवा रॅलीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांमध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तर, निवडणुकीबाबत जनजागृती करणारे चित्र देखील पाहायला मिळत आहेत.

संविधानाबाबत माहिती देणारे चित्र या चित्ररथात..

संविधानाबाबत माहिती देणारे xचित्र असून, या चित्रांम,ध्ये संविधानाची प्रास्ताविका त्यासोबतच संविधान म्हणजे काय? असे फलक लावण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला ‘इंडिया’ आघाडी असं नाव देण्यात आलं. ‘इंडिया’ आघाडीचा चित्ररथ देखील पाहायला मिळत आहे. मात्र, यात राजकीय पक्षांची चिन्ह नसून ‘इंडिया’ आघाडीचे ‘लढेगा इंडिया, जितेगा भारत’ हे स्लोगन असलेला चित्ररथ पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लक्षात घेता या चित्ररथात राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह वापरण्यात आलेली नाहीत. तर, सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक एकता असा संदेश या चित्ररथात देण्यात आला आहेr

गुढीपाडव्याला गिरगाव F असं नाव देण्यात आलं. ‘इंडिया’ आघाडीचा चित्ररथ देखील पाहायला मिळत आहे. मात्र, यात राजकीय पक्षांची चिन्ह नसून ‘इंडिया’ आघाडीचे ‘लढेगा इंडिया, जितेगा भारत’ हे स्लोगन असलेला चित्ररथ पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लक्षात घेता या चित्ररथात राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह वापरण्यात आलेली नाहीत. तर, सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक एकता असा संदेश या चित्ररथात देण्यात आला आहे.

संविधान वाचवा लोकशाही वाचवा…

विरोधकांकडून नेहमीच सध्याच्या सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जातो. या आरोपांची झलक देखील यावर्षीच्या गिरगाव गुढीपाडव्याच्या रॅलीत पाहायला मिळत आहे. याबाबतचा चित्ररथ या पाडवा रॅलीत सहभागी असून, या चित्ररथात ‘संविधान वाचवा लोकशाही वाचवा’ असा संदेश देण्यात आला आहे. तर, निवडणूक आयोग, आयकर विभाग, वाढत चाललेली जातीय तेढ, सरकारचा माध्यमांवरील दबाव, असे सर्व मुद्दे या चित्ररथात मांडण्यात आले आहेत.

महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचा आरोप….

भाजपाच्या काळात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढल्याचा आरोप नेहमीच विरोधकांकडून केला जातो. याबाबत जनजागृती करणारा चित्ररथ देखील गिरगावच्या पाडवा रॅलीत पाहायला मिळत असून, यात मणिपूरमधील हिंसाचार, महिला अत्याचार असे विषय आणि त्यांचे पोस्टर लावलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवसात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला काहीसं राजकीय वळण देखील यावर्षी पाहायला मिळत आहे.

पाडवा रॅलीवर निवडणूक आयोगाची नजर…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या नियमांचं कुठंही उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या टीम मुंबईत होणाऱ्या सर्व पाडवा रॅलीवर लक्ष ठेवून आहेत. गिरगाव इथं निवडणूक आयोगाच्या दोन टीम तैनात असून, एका टीममध्ये सहा जण असे एकूण 12 निवडणूक आयोगाचे कर्मचारी गिरगाव येथे तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी संपूर्ण रॅलीचं व्हिडिओ शूटिंग करणार आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाणार आहे. सोबतच आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडं प्राप्त झाल्यास त्याच्या तपासासाठी या व्हिडिओ फुटेजचा फायदा होणार आहे, अशी माहिती गिरगाव येथे तैनात निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page