उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवला, ते माझ्यामुळेच नेते झालेत -राजू शेट्टी…

Spread the love

अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला. आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी बोललो होतो. मात्र, त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितल. (Uddhav Thackeray) परंतु, आपल्याला ते मान्य नसल्याने आपण तो प्रस्ताव फेटाळला. परंतु, ठाकरेंनी शब्द फिरवला असंही राजू शेट्टी यावेली म्हणाले आहेत.

कोल्हापूर: राज्यातील सत्ता नाट्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नेते करण्यासाठी मी अनुमोदन दिलं होतं. माझ्यामुळं ठाकरे नेते झाले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेले हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आपल्या मागे उभा राहिला असा शब्द दिला होता. मात्र, ऐनवेळी ठाकरेंनी शब्द फिरवला, मशाल चिन्हावर लढणं म्हणजे पक्ष शिवसेनेत विलीन करणं. (Lok Sabha constituency) शेतकऱ्यांशी प्रतारणा करणं आपल्याला शक्य नसल्यानं आपण तो प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलं. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम केलं…

गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं. आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. महायुतीसोबतही आम्ही नाही. भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे. (Hatkanangale Lok Sabha) जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपने केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले. हमीभाव कायदा आणला नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र, त्यावेळी विरोध न करता आता नेत्यांकडून बोलले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे.

ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा शब्द ऐनवेळी फिरवला…

महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडून गेलेल्यांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही उमेदवार देऊ नका असं मी बोललो. कारण, शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही. मी मतदार संघात काम केलंय. शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठींबा द्या असं मी म्हणालो. मात्र, शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला. तो जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता. मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र, मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा शब्द ऐनवेळी फिरवला असं राजु शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.

ही निवडणूक कारखानदार विरुद्ध शेतकरी…

मला राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो. लोकसभा मतदारसंघातील आताचं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली असं वाटतं असेल. शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता आणि मला लोकसभा निवडून यायचं होतं. खासदार संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचे काम करतील काय? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page