
*नेरळ: सुमित क्षिरसागर-* पंधरा हजाराची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवली येथील राहणारा आहे.तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15 हजाराची मागणी केली होती आखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यात जाळ्यात अडकला.
तक्रारदार यांची नेरळ जवळील जिते गावातील सर्व्हे नंबर ९१/१७, ९१/१८, ९१/१, ९१/१६ जागेची नोंदी संदर्भात ही नोंद सात बारावर करायची होती.यासाठी सुरुवातीला हे प्रकरण तलाठी यांच्याकडे होते,तलाठी यांनी जागेवर नोंद करून अंतिम मंजुरीसाठी मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे पाठवले होते.दरम्यान मंडळ अधिकारी यांनी तक्रार दार यांच्याकडे एक नोंदीसाठी 15 हजार रुपये मागितले होते.अशा तीन नोंद करायची असल्याने ही रक्कम 45 हजार होती.तक्रारदार यांनी याबाबत मंडळ अधिकारी यांना तडजोडीसाठी विनंती केली परतू मंडळ अधिकारी भंडारे यांनी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांना चार महिने वेळ काढू पणा केला असता.यावेळी तक्रार दार यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.अखेर आज मंडळ अधिकारी पहिली नोंद करून घेण्यासाठी 15 हजाराची रक्कम स्वीकारताना नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली.यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्याच्याजवळ एक लाख अशी रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई डीवायएसपी नितीन दळवी,, पोलीस निरीक्षक संतोष पाटील,एस आय प्रदीप जाधव,पोलीस हवालदार रतन गायकवाड,पोलीस हवालदार नाईक,अहिरे,प्रमिला विश्वासराव यांनी केली आहे.