
महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे सांगितले जात असताना महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात आज नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशीही माहिती हवामान विभागाने दिली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापासून (१९ ऑक्टोबर) पुढील तीन दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, नाशिक या भागात जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
दरम्यान, २२ ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय, येत्या ५ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
*राज्यात गुरुवारी नोंदवण्यात आलेले तापमान..*
पुणे ३२.४ अंश सेल्सिअस, जळगाव ३४.२ अंश सेल्सिअस, कोल्हापूर २९.१ अंश सेल्सिअस, महाबळेश्वर २४.५ अंश सेल्सिअस, नाशिक ३२.३ अंश सेल्सिअस, निफाड ३२.५ अंश सेल्सिअस, सांगली ३०.३ अंश सेल्सिअस, सातारा ३१ अंश सेल्सिअस, सोलापूर ३२.५ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ ३४.४ अंश सेल्सिअस, डहाणू ३४.९ अंश सेल्सिअस, रत्नागिरी ३२.४ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ३२.८ अंश सेल्सिअस, बीड ३२ अंश सेल्सिअस, धाराशिव ३०.९ अंश सेल्सिअस, परभणी ३३.७ अंश सेल्सिअस, अकोला ३५.९ अंश सेल्सिअस, अमरावती ३४.८ अंश सेल्सिअस, भंडारा ३०.६ अंश सेल्सिअस, बुलडाणा ३२ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी ३६.९ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ३५.८ अंश सेल्सिअस, गडचिरोली ३४.६ अंश सेल्सिअस, गोंदिया ३३.८ अंश सेल्सिअस, नागपूर ३४.१ अंश सेल्सिअस, वर्धा ३४.२ अंश सेल्सिअस, वाशीम ३४ अंश सेल्सिअस, यवतमाळ ३३.२ अंश सेल्सिअस.