रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालय शहराजवळील कुवारबाव येथे साकारण्यात येत आहे. स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमीपूजन भाजपाचे नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज भाजपाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कुवारबाव येथे मुख्य महामार्गानजीकच लागून अरिहंत प्राईम या इमारतीच्या आवारात सुसज्ज असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. सुमारे २४ हजार चौरस फुटांचे हे कार्यालय असून तीन मजली इमारत आहे. यात दोन सभागृह, कार्यालय विभाग, भाजपाच्या महनीय व्यक्तींसाठी निवास, पार्किंग, लिफ्ट अशा सोयीसुविधांनी युक्त असे हे कार्यालय आहे. कोकणात भाजपाची ताकद वाढत असल्याचे हे लक्षण आहे.
आज भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सरचिटणीस सतेज नलावडे, सचिन वहाळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, अनिकेत पटवर्धन, मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे आणि दादा दळी, शहराध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषीकेश केळकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिल्पा मराठे, बावा नाचणकर, धनंजय मराठे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश शेवडे, नंदू चव्हाण, विक्रम जैन, प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नितीन जाधव, वर्षा ढेकणे, प्रवीण देसाई, लीलाधर भडकमकर यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते.