रत्नागिरी येथे धावत्या एसटी बसचा गिअर बॉक्स पेटला

Spread the love

रत्नागिरी :- रत्नागिरी – हातखंबा मार्गावरील रेल्वे स्टेशन फाट्यानजीक गयाळवाडी येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येणारी एसटी बस चालू असताना तिच्या गिअर बॉक्सने अचानकपणे पेट घेतला . चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने ५५ प्रवासी थोडक्यात बचावले .
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली . कोल्हापूर एसटी डेपोचे चालक सुहास शिंदे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस ( एमएच १४ बीटी ४९४५ ) घेऊन कोल्हापूर – मलकापूरमार्गे वाहक एस . एस . मराठे यांच्यासोबत रत्नागिरीकडे येते होते . या एसटीत कोल्हापूरहून रत्नागिरीकडे प्रवास करणारे ५५ प्रवासी होते . सोमवारी दुपारी कारवांचीवाडी येथे काही प्रवासी उतरल्यानंतर एसटी बस घेऊन चालक सुहास शिंदे हे रत्नागिरीच्या दिशेने येत होते . या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता . अशातच गयाळवाडी येथे आल्यानंतर गिअरबॉक्समधून अचानक धूर येऊ लागला . गाडीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक शिंदे यांनी एसटी रस्त्याच्या बाजूला उभी केली . आग लागल्याची कल्पना त्यांनी वाहक एस . एस . मराठे यांना दिली . त्यांनी एसटीच्या मागील बाजूला असलेला आपत्कालीन दरवाजा उघडून आतील ५५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले . दरम्यान , काही नागरिकांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देताच न.प.चा बंब घटनास्थळी दाखल झाला . तोपर्यंत इंजिनसह चालकाचे आसन जळून खाक झाले होते . अग्निशमन दलाने आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले . त्यामुळे संपूर्ण एसटी आगीत खाक होण्यापासून वाचली . या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज भोसले , पोलिस हेड कॉन्स्टेबल भितळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक सुहास शिंदे यांनी या घटनेची माहिती एस.टी.च्या रत्नागिरी आणि कोल्हापूर विभागाला दिली . त्यानंतर रत्नागिरी आगाराचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page