टँकरमधून गॅस चोरणाऱ्या फरार चालकाच्या संंगमेश्वर पोलीसांनी रायगड येथून मुसक्या आवळल्या…

Spread the love

संंगमेश्वर- टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅस चोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाच्या अखेर संगमेश्वर पोलिसांनीमुसक्या आवळल्या आहेत. शमशाद निषाद खान (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून, त्याला रायगड येथे सोमवारी संंगमेश्वर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून आणखी काही साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.

याबाबत शुभांक विजेंद्रपाल सिंग (३८) यांनी फिर्याद दिली होती. गल्फ कंट्रीज कंपनीचा टँकर (एमपी ३७, जीए १७८५) जयगड येथे १७.७५ टन गॅस भरून १९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता खोपोली (जि. रायगड)कडे निघाला. हा टँकर २० राेजी खोपोली येथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु, तो तेथे पोहोचला नाही. कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी शमशाद खान याला मोबाईलवर फाेन केला असता तो बंद होता. त्यांनी टँकरच्या जीपीएसची पाहणी केली असता ताे माभळे (ता. संगमेश्वर) येथे ११ तास थांबल्याचे दिसले.

त्यानंतर दिनांक २० रोजी दुपारी १:२७ वाजता चिपळूण येथे शेवटचे लोकेशन दिसले. मात्र, त्या लाेकेशनवर टँकर नव्हता. अन्य चालकांकडे चाैकशी केल्यावर टँकर पनवेलला गेल्याचे सांगण्यात आले. सुरेंद्र दिवेदी यांनी २४ राेजी पनवेल येथे जाऊन हा टँकर ताब्यात घेतला. त्या टँकरचे वजन केले असता एकूण वजन २३.३६० टन भरले. टँकरचे गॅससह एकूण वजन ३४.८६ टन भरणे आवश्यक होते. परंतु, त्यामध्ये ११.५०० टन वजनाचा गॅस कमी हाेता. या टँकरमधील ११.५ टन गॅसची चाेरी झाल्याचे लक्षात आले. पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, उपनिरीक्षक नागरगोजे यांनी पोलिस सचिन कामेरकर, सी. टी. कांबळे, विनय मनवल यांचे पथक तपासासाठी तयार केले. या पथकाने शमशाद खान याला रायगड येथील एका स्टील कंपनीतून अटक केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page