अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात. डोळ्यांची आग, छातीत जळजळ, अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात. अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
▪️मनुका –
हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी रोज रात्री 100 ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवावेत. सकाळी उठल्यानंतर हे मनुके चावून घ्यावे आणि त्या पाण्याचंही सेवन करावं.
▪️शरीरातील उष्णता किंवा पित्त कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करावा. यासाठी तुम्ही आहारात काकडी, आवळा, टरबूज, ब्रोकोली इत्यादींचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल, आरोग्यालाही फायदा होईल.
▪️जिरे –
जिरे अत्यंत थंड आहे. रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे. सकाळी या पाण्याचं सेवन करावं. यामुळं शरीराला थंडावा मिळतो. यामुळं वजनदेखील नियंत्रणात राहतं.
▪️पाणी समृद्ध आहार घ्या
शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी, आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. रोज 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय फक्त पाण्याने युक्त असा आहार घ्यावा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडी, टरबूज, स्ट्रॉबेरी, नारळ पाणी, फळांचा रस इत्यादींचा समावेश करू शकता. याशिवाय सूप, भाज्यांचा रस, उसाचा रसही फायदेशीर ठरू शकतो.
▪️सब्जा –
रात्री सब्जा काचेच्या भांड्यात भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी प्यावं.
▪️वेळेवर खा
शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी वेळेवर खाणेही खूप गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील आग योग्य प्रकारे वापरली जाते. पाचक रस देखील सुनिश्चित केला जातो. शरीराला थंडावा देण्यासाठी जेवणासोबत सॅलड जरूर खा. शरीरातील उष्णता शांत करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे.
▪️उष्णता वाढवणारे पदार्थ टाळा
उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावेत. असे अनेक पदार्थ आहेत, जे तुमच्या शरीरातील उष्णता वाढवतात. काळी मिरी, दालचिनी, लवंग यासारखे गरम मसाले शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे या सर्व गोष्टी खाणे टाळा.
▪️पुदीना –
जेवताना पुदीन्याचा जास्त वापर करावा. याची चटणी करूनही आहारात समाविष्ट करू शकता.
▪️कोकम सरबत –
जर कधी स्पायसी किंवा जंक फूड खाल्लं किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तर थोड्या वेळानं लगेच कोकम सरबत प्यावे.
▪️नारळ पाणी
तापमान झपाट्याने वाढणे शरीरासाठी चांगले नाही. अशा स्थितीत तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात जे उन्हाळ्यात शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात.
▪️पुदीना पाणी
पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याबरोबरच ताजेपणाही देतात. याशिवाय त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. म्हणूनच शरीर हळूहळू थंड होण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. शरीराला हायड्रेट करण्यासोबतच स्नायूंची ताकद वाढवण्यासही मदत होईल.
▪️ताक प्या
उन्हाळ्यात ताकाचे पाणी अतिशय फायदेशीर मानले जाते. ताकाचा थंड प्रभाव असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ताक देखील पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ते शरीराला ऊर्जा देते. उष्णतेचा सामना करण्यासाठी, आपण दररोज एक ग्लास थंड ताक प्यावे.