महाकाली देवस्थान ट्रस्ट आडिवरे येथे महाकाली रंगमंचावर सादर झालेले रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार संस्था संचलित माऊली नमन महिला नमन मंडळाचे महिलांचे पहिलेच नमन पाहताना खरचं एक उत्सुकता वाढताना दिसली कारण या नमनातील कलाकार हे अगदी १२ वर्षापासून ते ८० वर्षापर्यत या नमनात महिलांचा सहभाग पाहताना उर भरुन आले लेखक दिग्दर्शक नमन सम्राट श्री यशवंत वाकडे यांनी या नमनासाठी घेतलेली मेहनत उत्तमच होती जिल्ह्यातील महिलांचा नमनाचा पहिला प्रयोग सादरीकरणाचं फार मोठं साहस केलेले दिसले कॉश्युम, प्रॉपर्टी भरपूर आणि योग्य रितीने केलेली मांडणी. फार सुंदर. तसेच महिलांचे पाठांतर अप्रतिमच होते. सर्व कलाकारांनी आपली बाजू पूर्णत्वाकडे घेवून जाताना घेतलेली मेहनत उत्तमच होती.
पण काही असलं तरी माऊली नमन मंडळाने सादर केलेला आभार संस्थेच्या अष्टपैलू समाज कार्यात हा महिलांनी सादर केलेला प्रयोग म्हणजे एक मानाचा तुराच..!!
या प्रयोगात सौ प्रेरणा वीलणकर सौ वेदा शेट्ये,सौ सर्वता चव्हाण सौ रिमा देसाई,सौ पूनम गोळपकर,सौ शितल सकपाळ,सौ विनया काळप, सौ रेश्मा शिंदे,सौ समिक्षा वालम,सौ तन्वी नागवेकर सौ माधवी पाटील,सौ आकांक्षा वायंगणकर, सौ अर्चना मयेकर सौ ज्योती कदम सौ गीता भागवत श्रीमती रेश्मा खातू आणि कु पूर्वा चव्हाण या कलाकारांनी सहभाग घेवून आपली उत्तम कला सादर केली निर्माता श्री साईनाथ नागवेकर सुत्रधार श्री वासुदेव वाघे श्री सागर मायंगडे या नमन मंडळाला श्री दादा वाडेकर श्री शरद गोळपकर श्री राकेश बेर्डे श्री संजय मेस्त्री श्री मदन डोर्लेकर गुरूजी सौ मानसी साळवी यांचे विशेष सहाय्य लाभले होते
संगीत साथ श्री प्रविण सावंतदेसाई श्री परशुराम घवाळी श्री ओमकार मांडवकर कु पार्तेज आंबेरकर यांची तर नेपथ्य व्यवस्थापक श्री संतोष उर्फ बावा आग्रे यांनी घेतलेली मेहनत वाखाण्यासारखीच होती.