हजारो भक्तगणांची मांदियाळी;लाल रंगाची उधळण;मटण भाकरीचा प्रसाद
संगमेश्वर /प्रतिनिधी /मकरंद सुर्वे- महाराष्ट्रात प्रसिध्द असणारा संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचा शिंपणे म्हणजेच रंगपंचमी उत्सव संगमेश्वर तालुक्यात रविवार दि ७ एप्रिल रोजी संगमेश्वरसह , कसबा याठिकाणी संपन्न होणार आहे . या उत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे .
दरवर्षी फाल्गुन अमावस्या बळीचा मूर्त बघून शिंपणे उत्सवाची तारीख ठरवण्यात येते..
संपूर्ण महाराष्ट्रात ज्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यात केली जात नाही . फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून ही रंगपंचमी साजरी केली जाते . यालाच देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव असे म्हणतात . यावर्षी हा उत्सव येत्या ७ एप्रिल रोजी संपन्न होत असून कसबा – संगमेश्वर येथील मंदिरे सजविण्यात आली आहेत . या उत्सवात लाल रंगाची दिवसभर उधळण करुन भाविक देवीला रखवालीचे आणि नवसाचे जे नारळ , कोंबडे आणि बोकड अर्पण करतात त्याचा प्रसाद करुन रात्री मटण भाकरीच्या प्रसादाने या उत्सवाची सांगता होते .
शिंपणे उत्सवाला महाराष्ट्र मध्ये वेगळा दर्जा आहे…
या उत्सवात निघणारे रंगाचे फेरे हा येणाऱ्या भक्तगणांसाठी खास आकर्षणाचा विषय ठरतो . वर्षांची परंपरा असलेल्या या क्षणाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा दर्जा आहे. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी म्हणजे उत्सव साजरा फक्त संगमेश्वर मध्ये होतो. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो फक्त या सणासाठी संगमेश्वर ला हजेरी लावतात.
देवी निनावी, देवी जाखमाता देवी चंडिका या देवींचे शिंपणे उत्सव रविवारी दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाला महाराष्ट्रातून हजारो भाविक आवर्जून हजेरी लावतात व लाल रंगात यथेच्छ स्वतः ला न्हाऊन घेतात.
शिंपल्यामध्ये लाल रंगाचे परंपरा परंपरा व महत्त्व आहे…
शिंपणे उत्सवा मध्ये या लाल रंगाला विषेश दैवी महत्व आहे. लाल रंगाचा एक इतिहास आहे. बाकी कोणताही रंग शिंपणे उत्सवा मध्ये व्यर्ज असतो. त्यामुळे शिकण्यामध्ये लाल रंग उडवण्याची परंपरा आहे. पारंपारिक बैलगाडी त्यावरून उडवणारी लाल रंग ही इथली परंपरा आहे ती वर्षानु वर्ष झोपतली जात आहे. विशिष्ट पद्धतिने डोलाचे वादन करण्याची पद्धत फक्त शिकण्यामध्येच दिसून येते. व ती नवीन पिढीने जपले आहे. लाल रंग हे या शिकण्याचे वेगळेपण व महत्त्व आहे. जाखूबाई बाईच्या नावाने चांगभलं !!.. निनावी मातेच्या नावाने चांगभलं !!.. या नावाने आसमंत उजळून निघतो.
लाल रंगव्यतिरिक्त इतर रंग वापरणे टाळावे…
संगमेश्वर च्या शिंपणें उत्सवापूर्वी चिपळूण , रत्नागिरी आणि इतर ठिकाणची रंग पंचमी होत असल्याने काही भाविक येतांना तिकडे शिल्लक राहिलेले रंग संगमेश्वर शिंपणे उत्सवाला घेऊन येतात. त्या मध्ये पिवळा , केशरी , निळा ,हिरवा , सोनेरी; चंदेरी आणि भींती रंगवण्यासाठी ज्या स्ट्रेनर वापरतात त्याही आणल्या जातात असे निदर्शनास आले आहे. असे रंग चेहेऱ्यावर लावल्याने उत्सवाला असणारे लाल रंगाचे महत्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. लाल रंगा मुळे या उत्सवाची ओळख सर्व दुर पोहोचली आहे. आणि ती कायम राहाण्यासाठी संगमेश्वर करांनी आपल्या मित्र परिवाराला आणि पाहुण्यांना शिंपणे उत्सवाला रंग आणायचा झाल्यास लाल रंगा व्यतिरिक्त कोणताही रंग शिंपणे उत्सवामध्ये आणु नये असा आग्रह धरावा.
मटन भाकरीचा प्रसाद हे शिपण्याचे वेगळे वैशिष्ट्य…
संगमेश्वरच्या शिंपणे उत्सवामध्ये मटन भाकरीचा प्रसाद हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. आजूबाजूच्या गावातील महिला या दिवशी भाकऱ्या वाजवण्यासाठी निनावी मंदिर, जागमता मंदिर येत असतात. त्या भाकऱ्या भाजून देतात. तसेच प्रत्येक घरामधूनही भाकरे देण्याची परंपरा आहे. ती संगमेश्वर वासी याने आजही जपली आहे. सुके मटण हेही शिकण्याचे वैशिष्ट्य आहे. सदर मटणाला वेगळीच चव असते. परंपरेनुसार सदरचे मटण करण्यात येते. संध्याकाळी अगदी रात्री लेट पर्यंत सदर प्रसादाचे रांगेमध्ये भाविक उभे राहून सदरचा प्रसाद घेतात हेही या शिंपणे उत्सवाचे आवश्यक वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये यावेळी आवर्जून मटण चे जेवण करण्यात येते.
आपल्या उत्सवाची चालत आलेली परंपरा नवीन पिढी जपताना दिसते…
आपणच आपल्या उत्सवाची चालत आलेली परंपरा राखली पाहिजे आणि ती पुढील पिढी पर्यंत पोहोचवली पाहिजे तरच उत्सव आणि परंपरा अखंड अबाधित राहतील. आजपर्यंत वर्षानुवर्ष नवीन पिढी सदरचा सण जपत आले आहे. दर्शनामध्ये नाविन्यपूर्ण आणण्याचे काम हे नवीन पिढीने केले आहे. परंपरेनुसार ढोल वाजवणे व इतर परंपरा नवीन पिढी आत्मसात करून पुढे जपण्याचा प्रयत्न केला आहे.