चिपळूण, प्रतिनिधी- रत्नागिरी वन विभागांतर्गत जिल्ह्यांच्या सिमाभागात वनउपज तपासणी नाक्यांची स्थापना करणेत आलेली आहे.
हे नाके जिल्ह्यातून पर जिल्ह्यामध्ये वाहतुक होणाऱ्या वनउपजाची तपासणीचे काम करत असतात सद्यस्थितीमध्ये रत्नागिरीमधून कोल्हापूर जिह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर साखरपा येथे चिपळूण येथून सातारा जिल्ह्याच्या रस्त्यावर पोफळी येथे तर मुंबई गोवा महामार्गावर रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भरणे येथे असे एकूण ३ वनउपज तपासणी नाके आहेत.
या नाक्यांना आता अधुनिक स्वरूप देण्यात आले असून सद्यस्थितीमध्ये वनउपज तपासणी नाका पोफळी येथे सिसिटीव्ही बसविणेत आले आहेत. तर पुढील टप्प्यात वनउपज तपासणी नाका भरणे व साखरपा येथे सी सी टीव्ही बसविणेत येणार आहेत.
वनउपज तपासणी नाक्यांवरील सी सी टीव्ही मुळे अवैध वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण करता येईल असे वन विभागाचे विभागीय वन अधिकारी दिपक पो. खाडे यांनी सांगितले आहे.