यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाचा ३२ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारताचे फलंदाज लंकन गोलंदाजांपुढे सपशेल लोटांगण घालताना दिसले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना खूपच रोमांचक झाला, ज्यामुळे यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाचा ३२ धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात भारताचे फलंदाज लंकन गोलंदाजांपुढे सपशेल लौटांगण घालताना दिसले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २४१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ २०८ धावांत गारद झाला. ज्यामुळे यजमान श्रीलंका संघाने मालिकेत १-० शी आघाडी घेतली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करून भारताला भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस श्रीलंकेचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. शेवटी दुनिथ वेल्लालगे आणि कामिंडू मेंडिस यांनी चांगली खेळी खेळून श्रीलंकेला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. ज्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत नऊ गडी गमावून २४० धावा केल्या. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने १० षटकांत ३० धावांत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.