
श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर /धामणी- दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद उपक्रमशील शिक्षकांचे शालेय शैक्षणिक कामाचे मूल्यमापन करून प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी अशा हेतूने “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरव करते.त्या प्रमाणे रत्नागिइरी जि.प.च्या वतीने सन् २०२३/२४या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्काराने संगमेश्वर तालुक्यातील जि.प.शाळा आंबेड खुर्द नं १ चे शिक्षक कारभारी वाडेकर यांना नुकतेच पालक मंत्री,व महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.
शिक्षक वाडेकर यांनी शाळा कळंबस्ते,बौद्धवाडी,येथे बारा वर्षे सेवा करून त्याही शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर शाळा उमरे नं.१ ,फुणगुस मराठी,व आंबेड खुर्द नं १ येथे उत्तम सेवा करत असतांना पालक,व लोकसहभाग मिळवून शालेय गरजा, संगणक, लॅपटॉप,स्मार्ट टीव्ही,ईलर्निंग,अशा गोष्टी पूर्ण करून शालेय रंगकाम,सजावट,शैक्षणिक उपक्रम, कार्यानुभव कार्य शाळा,गरजू मुलांना साहित्य, बेस्ट स्कुल अवाॅर्ड शाळेला प्राप्त
झाले आहे. कोरोना काळातही संपर्क ठेवून अभ्यास,गृहपाठ असे अनेक प्रकारे मार्गदर्शन केले आहे.
तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. आनंददायी शिक्षण, आजी आजोबा दिन, शारदोत्सव,सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून शिष्यवृत्तीत व नवोदय परीक्षेत विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या पुरस्कारामुळे वाडेकर यांचे शिक्षक ,पालक ग्रामस्थ वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.