नाशिक- लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी B१२ कोचमधील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तत्काळ हालचाल केली. त्यांनी सहप्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसूती केली. नाशिकमधील मनमाड स्थानक सुटल्यानंतर या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. भुसावळ ते बुरहानपूर स्थानका दरम्यान गाडीतील महिला सहप्रवासी आणि तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने धावत्या गाडीत या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.
लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने महिला प्रवाशाला प्रसुतीस मदत केली. टीसी आणि ट्रेन मधील सहप्रवासी मदतीला धावून आल्याने महिलेची सुखरुप प्रसूती झाली. मध्य रेल्वेने ट्वीट करत या प्रसंगामध्ये मदतीला आलेल्या प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान नवजात बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. सतर्कता आणि तत्परता याचे उदाहरण रेल्वेत पाहायला मिळाले. १२२९३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दुरंतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी B१२ कोचमधील एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तत्काळ हालचाल केली. महिलेच्या प्रसूती वेदना पाहून धावत्या गाडीतील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी त्वरीत प्रतिसाद देत बोगीतील अन्य महिला प्रवाशाच्या मदतीने गर्भवती महिलेला सुरक्षितपणे प्रसूतीसाठी मदत केली.
ही घटना तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला कळवली आणि बुरहानपूर येथे ट्रेनचा तात्काळ थांबा देण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आई आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. बुरहानपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आई आणि नवजात बाळ दोघेही निरोगी आहेत. ते कुटुंब त्यांच्या मूळ गावी प्रयागराजला जात होते. दरम्यान ट्रेनमध्येच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिने गोंडस बाळाला जन्म दिला. या महिलेने बाळाला जन्म दिला असून बुरहानपूर येथे गाडी थांबवून महिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळ आणि आईची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेसमधील चार तिकीट तपासनिसांचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. तसेच, महिला आणि तिच्या कुटुंबीयांनीही मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनिसांचे आभार मानले आहेत.