तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

Spread the love

आपल्या भारत देशाची, त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची एक IAS, IPS किंवा IFS अधिकारी म्हणून काम करण्याची अनेकांची इच्छा असते, स्वप्न असतं. ज्यांना मनापासून असे काही करायची जिद्द असते, ते अगदी मोठ्या पगाराच्या नोकऱ्यादेखील सोडायला तयार असतात. अशाच एका अत्यंत जिद्दी आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क १६ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या, तृप्ती भट्टबद्दल जाणून घेऊ…

कुटुंबातील बहुतांश सदस्य शिक्षकी पेशातील असणाऱ्या परिवारात लहानाची मोठी झालेली तृप्ती भट्ट, उत्तराखंडमधील अलमोर येथील एक यशस्वी IPS अधिकारी बनली आहे. तृप्तीला अजून तीन भावंडं असून, त्या चौघांमध्ये ती सर्वात मोठी आहे. अलमोर, बेरशेबा उच्च माध्यमिक या शाळेमधून तृप्तीचे शालेय शिक्षण झाले असून तिने केंद्रीय विद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर, पंतनगर विद्यापीठातून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, सहाय्यक मॅनेजर म्हणून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (NTPC) ती रुजू झाली.

लहान वयातच तृप्ती भट्टने तिच्याकडे किती अफाट बुद्धिमत्ता आहे हे दाखवून दिले होते. UPSC परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याआधी तृप्तीने एक नव्हे, दोन नव्हे; तर तब्ब्ल १६ सरकारी नोकऱ्यांना नकार दिला होता. यामध्ये ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ [Indian Space Research Organisation] म्हणजेच इस्रो [ISRO] सारख्या मोठ्या संस्थेमधूनदेखील तृप्तीला नोकरीसाठी विचारण्यात आले होते.

तृप्ती नऊ वर्षांची असताना तिला दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली होती. जेव्हा तृप्ती अब्दुल कलामांना भेटली, तेव्हा त्यांनी तिच्यासाठी एक हस्तलिखित पत्र दिले होते. त्या पत्रामुळेच तृप्तीला देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आणि तिचे ध्येय बनले.

स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण असतात. परंतु, पहिल्याच प्रयत्नामध्ये तृप्ती यशस्वीरीत्या UPSC CSE २०१३ परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि १६५ वा नंबर पटकावून IPS अधिकारी हे स्थान निवडले. तृप्तीची तिच्याच होम कॅडरमध्ये नेमणूक करण्यात आली. सुरुवातीला तिची डेहेराडूनमध्ये पोलिस अधीक्षक [SP] म्हणून नेमणूक केली होती. नंतर तिने चामेलीमध्ये SP म्हणून कामगिरी केली. यानंतर तेहरी घरवालमध्ये, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी [SDRF] या पदावर नेमणूक झाली होती. मात्र, आता तृप्ती भट्ट डेहेराडूनमध्ये एक गुप्तचर आणि सुरक्षा एसपी [SP Intelligence and Security] म्हणून काम करत आहे, अशी माहिती DNA च्या एका लेखावरून समजते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page