कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याने महिला CISF जवान कुलविंदर कौर हीचे निलंबन…

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत चंदीगड विमानतळावर फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका CISF जवानाने अभिनेत्रीला थप्पड मारली होती . शेतकरी आंदोलनादरम्यानच्या कंगना राणौतच्या वक्तव्यामुळे ही महिला कॉन्स्टेबल संतप्त झाली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची आईही शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलन करायला बसली होती.

कंगना राणौतला थप्पड मारल्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी कुलविंदर कौर म्हणाल्या, “शेतकरी तिथे 100 रुपयांसाठी बसले आहेत, असे तिने विधान केले होते. ती तिथे जाऊन बसेल का? जेव्हा त्यांनी हे विधान केले तेव्हा माझी आई तिथे बसून निषेध करत होती.” दरम्यान, कंगना राणौतला थप्पड मारल्यानंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर बोलताना सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करून महिला कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

कंगनाने एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून म्हटले आहे की, दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने तिला थप्पड मारली आणि शिवीगाळ केली. कंगनाने ‘पंजाबमधील दहशत आणि हिंसाचारात धक्कादायक वाढ’ या शीर्षकाचे व्हिडिओ पोस्ट पोस्ट केले.

दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने एक निवेदन जारी केले की, कंगना म्हणाली, “महिला कॉन्स्टेबल तिच्या दिशेने आली. तिने मला थप्पड मारली आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली.’ दरम्यान, कगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार म्हणून निवडणूक आल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page