चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाच्या, भूगोल विभागाच्यावतीने आयोजित जिओ-डीबीजे २०२४ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विविध महाविद्यालयाचा भरगोस प्रतिसाद. गेली ६ वर्षे जिओ- डीबीजे या भूगोल विषयाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेची उस्तुकता विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच असते यावर्षी ही १४ जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून २० जानेवारी २०२४रोजी जिओ-डीबीजे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी न. ए. सोसायटीचे खजिनदार मा. श्री. अतुल जी चितळे, महाविद्यालचे प्राचार्य डॉ. माधव बापट, आय.क्यू.ए.सी. समन्वय प्रा. उदय बामणे,भूगोल विभाग प्रमुख डॉ. राहुल पवार, रजिस्टरार श्री. अनिल कलकुटकी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. आपल्या प्रास्ताविकात भूगोल विभाग प्रमुख डॉ. राहुल पवार यांनी भूगोल विभागाद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध विद्यार्थी केंद्री उपक्रमांचा आढावा घेतला, तसेच जिओ-डीबीजे स्पर्धा विद्यार्थ्यांना वाचन व अभ्यासाबरोबरचं उत्तम निरिक्षण क्षमता व संशोधन वृत्ती जागृत करण्यासाठी मदत करेल असे प्रतिपादन केले. बदलत्या स्पर्धात्मक काळात विद्यार्थ्यांनी विषयाचे सखोल ज्ञान आणि कौशल्य संपादक करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बापट सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील ६ कनिष्ठ महाविद्यालय आणि ७ वरिष्ठ महाविद्यालयाचे एकूण १४७ विद्यार्थांनी Geo- DBJ 2024 मधील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भूगोल विभागातील ३५ विद्यार्थीनी आयोजक म्हणून उत्तम कामगिरी केली.
महाविद्यालयातील प्रा. श्वेता चितळे, प्रा. मुग्धा पाध्ये, प्रा प्रथमेश डिंगणकर प्रा. प्रशांत चव्हाण, प्रा. अभिजीत निकम, प्रा. अमृता खरे-पाध्ये डॉ राजू झोरे, डॉ राहुल पवार तसेच श्री संकेत हळदे यांनी विविध स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडली. भूगोलाची आवड असणाऱ्या विद्यार्थांसाठी ही स्पर्धा एक अनोखी पर्वणीच ठरली आहे.
वरिष्ठ महाविद्यालया निकाल पुढीलप्रमाणे पोस्टर मेकिंग
प्रथम:- भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी,द्वितीय :- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख,तृतीय सौ शैलेजा शिंदे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पेढांबे,पीपीटी प्रेझेंटेशन
प्रथम- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख, द्वितीय :- सौ शैलेजा शिंदे महाविद्यालय पेढांबे.तृतीय : भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी. नकाशा भरणे.प्रथम :- गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरी. द्वितीय : आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुख. तृतीय :- छ. शा महाराज महाविद्यालय, टेटवली . पझल. प्रथम :- आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय देवरुख.द्वितीय नवनिर्माण महाविद्यालय, संगमेश्वर. तृतीय आबासाहेब मराठे महाविद्यालय, राजापूर. प्रश्नमंजुषा-प्रथम : आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुख. द्वितीय : गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरी.तृतीय : भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी. माय-जिओ-क्लिक फोटोग्राफी, प्रथम :- आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुख,द्वितीय गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरी.तृतीय : भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी,जिओ- व्होग व्हिडिओ. प्रथम:- आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय देवरुख.द्वितीय: गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालय रत्नागिरी.तृतीय : भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी. सर्वाधीक प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची बक्षिसे मिळवून आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालय देवरुख हे ओव्हरऑल चॅम्पियन्स ठरले. वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धांसोबतच कनिष्ठ महाविद्यालयासाठी देखील स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय निकाल.पोस्टर मेकिंग
प्रथम :- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख.द्वितीय :- डीबीजे महाविद्यालय, चिपळूण.तृतीय :- न्यू इं स्कू आणि कनिष्ठ महाविद्यालय, सती ,पीपीटी सादरीकरण,प्रथम :- न्यू इं स्कू आणि कनिष्ठ महाविद्यालय, सती.द्वितीय :- डीबीजे महाविद्यालय, चिपळूण. तृतीय :- नॅशनल, कॉलेज, मिरजोळी. नकाशा भरणे. प्रथम :- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख. द्वितीय :- नॅशनल, कॉलेज, मिरजोळी
तृतीय :- न्यू इं स्कू आणि कनिष्ठ महाविद्यालय, सती .मॅप- पझल. प्रथम :- ए सी पी कॉलेज, लवेल. द्वितीय:- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख.प्रश्नमंजुषा
प्रथम :- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख.द्वितीय:- ए सी पी कॉलेज, लवेल.तृतीय:- डीबीजे महाविद्यालय चिपळूण
माय- जिओ- क्लिकळ-प्रथम :- आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, देवरुख. द्वितीय :- न्यू इं स्कू आणि कनिष्ठ महाविद्यालय, सती .तृतीय डीबीजे महाविद्यालय चिपळूण
जिओ- व्हॉग.प्रथम डिबीजे कनिष्ठ महाविद्यालय चिपळूण
द्वितीय : न्यू इं स्कू आणि कनिष्ठ महाविद्यालय, सती
सर्व सहभागी विद्यार्थांना सहभाग प्रमाणात पत्र तसेच विजेत्या स्पर्धकांना प्रमाणापत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. या स्पर्धे विषयी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिओ-डीबीजे या स्पर्धेमुळे भूगोल विषयासंबंधी असणारे गैरसमज दुर झाले आणि दैनंदिन जीवनात भूगोल विषयाचे असणारे महत्त्व अधिक उत्तम पध्दतीने आम्हाला समजू शकले असे मनोगत गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या सेजल या विद्यार्थ्यांनीने व्यक्त केले, तर या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे मनोगत, न्यू इं. स्कू आणि ज्यू कॉलेज सती चे प्राध्यापक पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले.
न ए सोसायटीचे चेअरमन मा श्री. मंगेश जी तांबे , प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. एम.एस चांदा, उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेते स्पर्धक-विद्यार्थी, यांचे व सर्व सहभागी महाविद्यालयांचे हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.