मराठी पाट्या संदर्भात दिवा मनसेच्या प्रयत्नांना यश

Spread the love

मराठी पाट्या संदर्भात दिवा मनसेच्या प्रयत्नांना यश

• ठाणे : प्रतिनिधी मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकांनवर कारवाई करण्यासाठी ठामपा आयुक्तांनी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून ती लेखी स्वरूपात जाहीर करावी अशा मागणीचे पत्र ईमेल द्वारे ठामपा आयुक्तांना सोमवार, ४ डिसेंबर रोजी दिले होते. त्यावर आज ठामपा आयुक्तांनी याबाबतचे लेखी निर्देश जाहीर केले.

ह्या नियमांमधला ३५ क्रमांकाचा नियम सर्वात महत्वाचा आहे. तो नियम म्हणतो:

३५. नामफलक मराठीत असावा.- प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे:
परंतु, मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. तथापि, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.:
परंतु, आणखी असे की, ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुषांची किंवा गड-किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page