नवीमुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. यावेळी समाजबांधवांनी गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला.
गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होतं. यावेळी गिरीश महाजन, दीपक केसरकर हेही उपस्थित होते. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.