![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/02/1001065697.jpg)
*संगमेश्वर/(दिनेश अंब्रे)-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, महाराष्ट्र (भारत रजि.) तसेच विश्व समता कला मंच, लोवले संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार व जलसा, गीतगायन स्पर्धा – २०२५ नुकतीच संपन्न झाली.
या भव्य सोहळ्यात परचुरी गावचे उपसरपंच, निरंकारी भक्तगण आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप विश्राम चंदरकर यांना ‘राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा पट्टा असे होते. या प्रसंगी संस्थापिका-संपादिका सौ. भावना खोब्रागडे, संस्थापक-अध्यक्ष मनोज जाधव, दीपक पवार, प्रदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातून श्री. प्रदीप चंदरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.