
बीड प्रतिनिधी- 5 सिमकार्ड वापरले; कल्याणमधून अटक – मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका नव्या आरोपीची वाढ झाली. सिद्धार्थ साेनवणे असे या आरोपीचे नाव आहे.सिद्धार्थ यानेच ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे लोकेशन मुख्य आरोपी सुदर्शन घुले यालादिल्याचा पोलिसांचादावा आहे. देशमुखांच्या हत्येनंतर त्याच दिवशी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात त्याने सहभाग घेतला.देशमुखांच्या अंत्यसंस्कारालाही त्याने हजेरी लावली. मात्र तपास सीआयडीकडे जाताच त्याने पळ काढून कल्याण गाठले होते.
उसाची गाडी भरत असताना सिद्धार्थ गजाआड
सिद्धार्थ सोनवणे याने गावातून फरार झाल्यानंतर पाच सिमकार्ड बदलले. तोकल्याणमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उसाची गाडी भरत असतानात्याला गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. शनिवारी त्यालाही केज न्यायालयाने १५दिवसांची कोठडी सुनावली. दिली होती.
दोन दिवस गावात, नंतर काढला पळ
देशमुखांच्या हत्येनंतर आंदोलन वअंत्यविधीला सोनवणे उपस्थित होता. दोनदिवसांनी या प्रकरणात पोलिस तपासालागती आली व काही आरोपी अटक झाले.त्यानंतर आपलेही नाव येण्याच्या शंकेनेत्याने गावातून पळ काढला.
कोण आहे सोनवणे?
सिद्धार्थ सोनवणे हा सुमारे ३० वर्षांचा आहे.तो मस्साजोग या संतोष देशमुख यांच्यागावातीलच रहिवासी आहे. तो बेरोजगारअसून त्याची आर्थिक स्थिती बेताची आहे.आई-वडील मोलमजुरी करतात. सिद्धार्थहा गुंड प्रवृत्तीचा आहे. सुदर्शन घुले याच्यासंपर्कात तो असायचा.