
श्रीकृष्ण खातू/ संगमेश्वर – दरवर्षी कोकणात खूप पाऊस पडूनही एप्रील व मे अखेरीस पाण्याचा होणारा तुटवडा ,व त्या साठी पाणी जमिनीत जिरले तर थोडेफार अखेरीस पाणी मिळू शकते. कारण पाणी आपले जीवन असून शासनाच्या पाणी आडवा, पाणी जिरवा,या ब्रीद वाक्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील पाचवी पर्यत असलेली शाळा तुरळ सुवरेवाडी व अंगणवाडीतील छोटे विद्यार्थी, शिक्षक,सेविका, मदतनीस,पालक यांच्या श्रमदानातून तुरळ येथील सुवरेवाडीतील ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला.



चिमुकल्यां मुलांनी आपल्या श्रमदानातून उभारलेला बंधारा खरोखरच शासन ब्रीद वाक्यातील उपक्रमास एक खारीचा वाटा म्हणून एकदम योग्य व साजेसा वाटतो.यासाठी केलेल्या परिश्रम व श्रमदानामुळे पाण्याचे महत्व मुले नक्कीच जाणतात.व पाण्याचा वापर काटकसरीने करतात.हेच खरे या उपक्रमाचे फलीत आहे.
यासाठी तुरळचे सरपंच सहदेव सुवरे ,शिक्षक आबासाहेब लवटे, स्वाती येलोंडे,अंगणवाडी सेविका विचारले ,मदतनीस गितांजली सुवरे,शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष महेश निवळेकर, उपाध्यक्ष नम्रता सुवरे, सुवरेवाडीचे गावकर सिताराम सुवरे,ग्रामस्थ, पालक,उत्साहाने सहभागी झाले होते.