ठाणे/मुरबाड/लक्ष्मण पवार – मुरबाड मधिल शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात असणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्या वरील अभुषणे गायब झाल्याची संतापजनक घटना समोर आल्याने संतोष विशे तालुका प्रमुख, संघटक, सतिष भोईर, उपतालुकाप्रमुख गुरुनाथ भावार्थे योगिता शिर्के यांच्या सहअनेक शिवसैनिकांनी उप अभियंता कैलास पंतिगराव यांना घेराव घेराव घालत जाब विचारुन संताप व्यक्त केला .हि घटना नायब तहसीलदार सुषमा बांगर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून वातावरण शांत केले.
तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या शिवनेरी शासकीय विश्रामगृहात नेहमीच लोकप्रतिनिधी , मंत्री तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची नेहमीच वर्दळ असते मात्र तेथे दर्शनी भागात असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे पुतळ्याचे अंगावरील मोत्याच्या माळा, कानातील वाळ्या गायब झाल्या असून तेथे असणारी शिवमुद्रा देखील गायब झाल्याचे निदर्शनास आले असता , शिवसैनिकांनी परिसराचा शोध घेतला असता शिवमुद्रा चक्क कचऱ्याचे ढिगाऱ्या आढळली.याबाबत संतप्त शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कैलास पंतिगराव यांना जाब विचारला असता त्यांनी न ऐकल्या सारखे केले.
त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला त्यांनी तहसीलदारांना यांची माहिती दिली असता नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करत घडलेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करत शिवप्रेमींना शांततेचे आवाहन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना धारेवर धरुन शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन वातावरण शांत केले.