टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत जोरदार सुरुवात केली आहे. शिवम दुबे हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
मोहाली- टीम इंडियाने अफगाणिस्तानवर पहिल्या टी 20 सामन्यात 6 विकेटे्सने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्स गमावून 17.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकर शिवम दुबे टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. शिवमने नाबाद 60 धावांची विजयी खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग….
टीम इंडियाची 159 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. रोहित शर्मा डावातील दुसऱ्याच बॉलवर झिरोवर रनआऊट झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 28 धावा जोडल्या. त्यानंतर शुबमन गिल 23 धावा करुन माघारी परतला. शुबमननंतर शिवम दुबे मैदानात आला. शिवम आणि तिलक या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 34 रन्सची भागीदारी केली. तिलक 26 धावा करून मैदानाबाहेर गेला.
अमरावतीकर जितेश शर्मा आणि शिवम दुबे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. त्यानंतर जितेश 31 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. रिंकू पुन्हा एकदा नाबाद परतला. रिंकूने नाबाद 16 धावा केल्या. तर शिवम दुबेने टी 20 मधील दुसरं अर्धशतक ठोकत विजयात मोठी भूमिका बजावली. शिवमने 40 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नॉट आऊट 60 रन्स केल्या. तर अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान याने 2 विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह झझाई याने 1 विकेट घेतली.
टीम इंडियाची विजयी सुरुवात…
अफगाणिस्तानची बॅटिंग…
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. अफगाणिस्तानने मोहम्मद नबी याच्या 42 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन-
इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.