नवी मुंबईतील ‘स्पा’ मध्ये सेक्स रॅकेट उघड…

Spread the love

नवी मुंबई ,वाशी – नवी मुंबई येथील वाशी भागात एका प्रसिद्ध मॉलमध्ये सेक्स रॅकेट पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मॉलमध्ये एक स्पा सुरु होता. जेथे मोठ्या संख्येने मॉलिश करण्याचा धंदा सुरु होता. प्रत्यक्षात तेथे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून २० वर्षीय दोघींना आणि स्पाच्या संचालिका यांना ताब्यात घेतले आहे. या दोन मुलींनी आपला जबाब देताना ४० वर्षीय महिलेवर आरोप लावला आहे की, तीने जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले. या मुलींना पोलिसांनी महिलाश्रमामध्ये पाठविले आहे.

नवी मुंबईतील एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सेल चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी ही कारवाई केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून परिसरातील सर्व स्पा केंद्रांवर पोलिस धाडी टाकण्याच्या तयारीत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page