श्रीकृष्ण खातू / धामणी – संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इस्रो व नासाची परीक्षा दिलेल्या मुलांमधून ,तालुक्यातील सात मुलांची निवड झाली आहे..यापैकी पाच मुलांना या तालुक्यात चालू असलेल्या राष्ट्रीय सेवा समिती अंतर्गत फिरती विज्ञान प्रयोग शाळा उपक्रमाचा फायदा झाला आहे.
सदर परीक्षेपूर्वी कांही दिवस अगोदर दोन दिवस प्रयोग शाळेचे प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी आपल्या घरी दोन दिवस प्रात्यक्षिके विविध प्रयोगांची करून दाखवली.व मुलांकाडून करवून घेतली. व त्यातून साहित्य, कृती, प्रात्यक्षिके, निष्कर्षे,अनुमान ,अनुभव या मुद्यांची विस्त्रृत माहिती दिली. यासाठी संबधीत शाळांचे शिक्षकांच्या मदतीने काजवे यांनी मेहनत घेतली.
यामुळे मुलांच्या तर्कशुध्द कल्पना शक्तीला. चालना मिळाली.व मुलांना सादरीकरण करण्यात समरस झाली.व उत्स्फूर्त मुलांनी काजवे यांच्या घरी दोन दिवस राहून विज्ञान पाठ्य पुस्तकातील विविध प्रयोग समजावून. घेतले.याचाच फायदा निवड झालेल्या तालुक्यातील सात पैकी पाच मुलांना नक्की झाला असल्याने दिलीप काजवे व शाळांचे शिक्षक सांगतात.
काजवे यांच्या मेहनतीमुळे प्रकल्प समिती प्रमुख जिंक्य पावसकर यांनी सदर मुलांचे व काजवे यांचे अभिनंदन केले आहे.