जगाचा अंत कधी होणार; पहा सविस्तर

Spread the love

आपण जगाच्या अंतासंदर्भात विविध प्रकारचे भविष्य ऐकले असेल. काही म्हणतात की, पुरामुळे जग संपेल तर काही म्हणतात की, ते जळून जाईल. मात्र आता शास्त्रज्ञांनी दावा केला की सर्वनाश कसा आणि कोणत्या दिवशी येईल.

आपण राहत असलेल्या जगाबद्दल बरेच काही सांगितले जाते. काही लोक म्हणतात की, प्रत्येक गोष्टीचा अंत असतो आणि एक दिवस जगाचाही अंत होईल.

काही लोक त्या दिवसाला प्रलयकारी दिवस म्हणतात. मात्र डायनासोरबद्दल मांडलेल्या संकल्पनांपैकी, सर्वात वैध सिद्धांत असा आहे की, त्यांचे अस्तित्व एका प्रचंड उल्कापिंडाशी टक्कर झाल्यानंतर संपले असेल. त्यामुळे पुन्हा अशीच घटना घडणार का?

अवकाशाच्या जगात अनेक रहस्ये आहेत, त्याबद्दलची माहिती आपण फार कमी शोधू शकलो आहोत. दररोज पृथ्वीजवळून उल्का गेल्याच्या बातम्या येत असतात.

मात्र ज्या मोठ्या उल्कापिंडाबद्दल शास्त्रज्ञांच्या मनात कायम भीती असते, त्या उल्कापिंडामुळे पृथ्वीचा अंतही होऊ शकतो. ही उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळणार आहे आणि ती इतकी भीषण टक्कर होईल की, त्यातून २२ अणुबॉम्ब एवढी ऊर्जा निर्माण होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सुमारे साडेसात वर्षांपूर्वी बेनू पिंडाचे नमुने गोळा करण्यासाठी एक अवकाशयान पाठवण्यात आले होते, जेणेकरून त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग पृथ्वीला वाचवण्यासाठी करता येईल.

नासाच्या गोदार्द स्पेस फ्लाइट सेंटरचे प्रोजेक्ट मॅनेजर रिच बर्न्स म्हणाले की, संशोधनाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अवकाशयानातून आणलेल्या उल्कापिंडाच्या धूलिकणात कोणते घटक आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण बेनू हे त्याच लघुग्रहांच्या कणांनी बनलेले आहे, जे वेळोवेळी पृथ्वीवर आदळत आहेत.

बेनूची पृथ्वीशी टक्कर होण्याची तारीख किमान एक शतक दूर आहे आणि तोपर्यंत ते टाळण्यासाठी संशोधन सुरू राहणार आहे, ही दिलासादायक बाब आहे.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page