दिवा भाजप मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांचा खळबळजनक दावा..पहा सविस्तर

Spread the love

दिवा रोहिदास मुंडे यांचे अध्यक्ष पद जाऊन सचिन भोईर अध्यक्ष होणार हे दिव्यातील शिंदे गट मागील दोन महिन्यापासून भविष्यवाणी करीत होते!!

दिवा: प्रत्येक पक्षात पदाधिकारी नियुक्त करणे ही पक्षांतर्गत बाब आहे पण रोहिदास मुंडे यांचे मंडळ अध्यक्ष पद जाणार हे शिंदे गटातील दिव्याच्या नेत्यांना दोन महिन्यापासून माहीत होतं. रोहिदास मुंडे यांचे पद जाऊन सचिन भोईर अध्यक्ष होणार हे शिंदे गटाला आधीच माहीत होतं असा खळबळजनक खुलासा रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

दिवा शहरात शिंदे गटाचे नेते माजी उपमापौर श्री.रमाकांत मढवी यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीका करत त्यांचा गैरकारभार उघडकीस आणल्यानेच आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले का?असा प्रश्न दिव्यातील रोहिदास मुंडे समर्थक यांच्या मनात निर्माण झाला आहे, मात्र दिवा भाजपचा मंडळ अध्यक्ष बदलला जाणार आणि त्या ठिकाणी सचिन भोईर यांची नियुक्ती होणार हे दोन महिन्यापासूनच दिव्यातील शिवसेनेच्या नेत्यांना माहीत होतं.तशी चर्चा जनसामान्य लोकांमध्ये करत होते.आमच्या पक्षात काय चालले आहे हे शिंदे गटाला आधीच माहीत होतं असा खळबळ जनक दावा भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

जिल्हा अध्यक्ष बदलल्या नंतर मंडळ अध्यक्ष बदलत असतात.पण कोणाला काढणार आणि कोणाला अध्यक्ष करणार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना कळत नसतं पण दिव्यात सर्व काही आधीच ठरले होते असं शिंदे गटाच्या भूमिकेवरून दिसते असे मुंडे यांनी म्हटले आहे.शिंदे गटाच्या दबावाखाली भाजपची पक्ष संघटना दिव्यात चालणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिव्यात काम कसं करायचं?

असा सवाल रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.आधीच शिंदे गटाने भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष पळवले होते.ते दोन्हीही माजी मंडळ अध्यक्ष शिवसेनेत गेल्यानंतर भाजप खिळखिळी करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत होते. अशात भाजपचा किल्ला लढवत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील पाच वर्षांपासून भाजपचा दिव्यात विरोधक असणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे भाजपच्या माध्यमातून आम्ही काढत होतो.

पाणी प्रश्न,आरोग्याचा प्रश्न,डम्पिंग ग्राउंड,अनधिकृत बांधकामे या विषयावर आंदोलने भाजपच्या माध्यमातून होत असल्याने मनमानी करणाऱ्या शिंदे गटाला दिव्यात अडचण होत होती. यातूनच दोन महिन्यापासून दिवा भाजपचा मंडळ अध्यक्ष बदलणार आणि श्री.सचिन भोईर यांना मंडळ अध्यक्ष करणार अशी उघड चर्चा दिवा शिवसेनेचे नेते करत होते.दिवा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितल्या प्रमाणेच घडल्याने त्यांची भविष्यवाणी खरी ठरली, ह्या पुढील दिशा वेळ आणि काळ ठरवून केली जाईल असे दिवा भाजपा रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page