
कन्नड- महायुतीत राज्यातील जवळपास 278 जागेवर एकमत झाले होते. मात्र कन्नड -सोयगाव विधानसभेच्या जागेसह 10 जागेचा तिढा गेल्या काही दिवसापासून सुटण्याचे नाव घेत नव्हता. मात्र आता कन्नड-सोयगाव विधानसभेच्या जागेचा तिढा अखेर आज सुटल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
महायुतीत कन्नडची जागा शिवसेना लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असुन कन्नड मधुन माजी केंद्रीय मंजी रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढणार असून आज 12 वाजता मुंबईत किंवा ठाण्यात संजना जाधव यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या पक्ष प्रवेशासाठी संजना जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दीड वाजता विमानाने मुंबईत दाखल झाल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दोन्ही सेनेत पहिल्यांदा होणार समोरासमोर लढत…
महाविकास आघाडीत ही जागा उबाठा सेनेला सुटली असुन विद्यमान आमदार उदयसिंग राजपुत यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. कन्नड जागा गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची जागा राहिली असल्याने ह्याच एका मुद्यावर महायुतीत कन्नडची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसारखा प्रयोग कन्नड मतदारसंघात मराठा सक्षम उमेदवार देऊन त्यांनी केल्याची चर्चा तालुक्यात आहे.
रावसाहेब दानवे यशस्वी..
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आहे. ऐवढेच नाही तर महायुतीच्या जागा वाटपाच्या कोर कमिटीत देखील दानवे मुख्य पदावर ते आहे. भाजपचे एक कुटुंब एक तिकीट हे धोरण असल्यामुळे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात हि जायाचे नाही. आणि मुलांचे आणि मुलीचे हि राजकीय पुनर्वसन तर करायचे म्हणून रावसाहेब पाटील दानवे यांनी आपले राजकीय वजन वापरत मुलगी संजना जाधव यांच्यासाठी कन्नडची जागा हि महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होईल..
स्थानिक शिंदे शिवसेनेच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्याकडून जरी सध्या संजना जाधव यांच्या प्रवेशाला आणि उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे. मा़त्र त्या नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यशस्वी होतील अशी तालुक्यात चर्चा आहे.
